AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AI च्या मदतीने स्मार्ट शेती, खर्च होणार इतका कमी, उत्पादन वाढीची फडणवीसांची गॅरंटी, शेतकऱ्यांना काय दिला मंत्र?

Devendra Fadnavis on AI Farming: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान शेतातील एआयच्या वापरावर शेतकऱ्यांना खास मंत्र दिला. त्यांनी एआयच्या वापरामुळे खर्च किती कमी होईल आणि उत्पादन किती वाढेल याचे गणित मांडले. राज्य सरकारने शेतीसाठी खास एआय ॲप आणल्याची माहिती दिली.

AI च्या मदतीने स्मार्ट शेती, खर्च होणार इतका कमी, उत्पादन वाढीची फडणवीसांची गॅरंटी, शेतकऱ्यांना काय दिला मंत्र?
देवेंद्र फडणवीस
| Updated on: Aug 02, 2026 | 4:17 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीत एआय तंत्रज्ञानाने काय काय बदल होतील, याची माहिती दिली. त्यांनी एआय तंत्रज्ञान आता मराठीतच नाही तर आदिवासी भाषेतही उपलब्ध असल्याचे सांगितले. एआयच्या वापरावर त्यांनी शेतकर्‍यांना खास मंत्र दिला. त्यांनी एआयच्या वापरामुळे खर्च किती कमी होईल आणि उत्पादन किती वाढेल याचे गणित मांडले. राज्य सरकारने शेतीसाठी खास एआय ॲप आणल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. एआय तंत्रज्ञानाचे फायद्याचे गणित त्यांनी मांडले.

25 टक्के खर्च कमी, उत्पादन 30 टक्क्यांनी वाढणार

कृषी हे एक क्षेत्र ज्याला AI संबंधित तंत्रज्ञानाची मदत होईल. महाराष्ट्र सरकारने महाविस्तार AI App सुरू केले. कोणताही शेतकरी आपल्या भाषेत, अगदी आदिवासी भिल्ल भाषेत कृषी क्षेत्रातील शंका, समस्या, कीड नियंत्रण, मायक्रो न्यूट्रेंट विषयी विचारू शकतो. पिकाचा एक फोटो घेऊन अपलोड केला तर ते त्याचीं स्थिती, कोणते कीड येऊ शकतात आणि त्यासाठी काय केले पाहिजे ते सांगते. AI चा वापर केला तर शेतीत 25 टक्के खर्च कमी येईल आणि उत्पादन, आउटपुट 30 टक्क्यांनी वाढते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नोकर्‍या जाणार नाहीत

AI जीवनाचे सर्व क्षेत्र बदलत आहे. या क्षेत्रातील मोठ्या जाणकाराने सांगितले की पुढील एक हजार दिवसात 75 टक्के नोकर्‍यांचे स्वरूप बदलेल. नोकर्‍या जाणार नाहीत, त्यांचे रूप बदलेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. अशा वेळी आमच्या शैक्षणिक संस्थानी परिवर्तन स्वीकारून शिक्षण देण्याची पद्धत बदलली पाहिजे. मला आनंद आहे की अत्याधुनिक AI लॅब इथे स्थापन करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

डेटा ऑईल पेक्षा महत्वाचा

डेटा ऑईल पेक्षा महत्वाचा आहे. डेटा विविध मॉडेल्स मध्ये बनून उद्योग आणि मानवतेला मदत करतो आहे. आरोग्य सेवेला पुन्हा आकार देत आहे. या वर्षी सुरुवातीला डेव्होस मध्ये स्वित्झर्लंड मध्ये स्वास्थ्य मंत्र्यांशी बोलत असताना त्या म्हणाल्या की आता जन्मनारी व्यक्ती किमान शंभर वर्षे नक्की जगेल. नवीन तंत्रज्ञान देखील AI मुळे बदलते आहे.आपण एकटे अभ्यास करत असू. आज फ्रंटियर टेक्नॉलॉजी आणि डीप टेक चा काळ आहे. कित्येक तंत्रज्ञानाचा वापर करून नवी प्रणाली आज जन्म घेते. NEP 2022 अंतर्गत बहु कोणीय अप्रोच सांगितलं आहे. AI आणि कॉन्टम कम्प्युटिंग सारे काही बदलणार आहे. नोकरी क्षेत्रात बदल घडत असल्याने आधुनिक रोजगारक्षम ह्युमन रिसोर्स तयार करण्याची गरज आहे, असे फडणवीस म्हणाले.

रामदेवबाबा विद्यापीठ हेच कित्येक वर्षापासून करत आहे. आम्ही नवीन AI models तयार करू शकतो. नव्वद टक्के इनोवेशन हे उद्योगांतून नव्हे तर शैक्षणिक संस्थांतून आले आहे. रामदेवबाबा या क्षेत्रात भरपूर काम करत आहे. 90 स्टार्ट अप्स ला मदत करत आहे. मध्य भारतातील पुढचे इनोवेशन या शहरातून आणि या संस्थेतून पुढे येईल हा माझा विश्वास आहे. सत्यनारायण नुवाल आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत AI लॅब चे उद्घाटन समारंभ हा आनंदाचा विषय आहे. बनवारीलाल पुरोहित यांनी स्थापना केलेली संस्था आज अग्रणी बनली असे फडणवीस म्हणाले.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता