दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, एक असा मुद्दा ज्यावरुन अमित शहा उद्धव ठाकरेंवर खूश होणार, शाबासकी देणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर बैठक होणार आहे. नक्षलवादवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारकडून बैठक बोलावण्यात आली आहे.

दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, एक असा मुद्दा ज्यावरुन अमित शहा उद्धव ठाकरेंवर खूश होणार, शाबासकी देणार?
अमित शाह आणि उद्धव ठाकरे


नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर बैठक होणार आहे. नक्षलवादवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारकडून बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, गडचिरोली पोलिसांची गेल्या 2 वर्षांतली नक्षलग्रस्त भागातली दमदार कामगिरी पाहता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्धव ठाकरे यांचं कौतुक करण्याची शक्यता आहे.

अमित शहा उद्धव ठाकरे यांचं कौतुक करण्याची आशा

देशातील अंतर्गत सुरक्षेबाबत आज दिल्लीत होणाऱ्या नक्षलवादावरील महत्त्वपूर्ण बैठकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे नक्षलपरिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील यांच्याशी टीव्ही 9 मराठीने बाचचित केली. “गेल्या दोन वर्षांमध्ये गडचिरोली पोलिसांनी उत्तम कामगिरी केलीय. विशेषत: उत्तर गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांना मोठा सेटबॅक मिळालाय. त्याचबरोबर दक्षिण गडचिरोलीमध्ये आक्रमक पवित्रा ठेवून काही महत्त्वाचे अभियान राबवत आहोत. आजची होणारी बैठक दर एक-दोन वर्षांनी रेग्यूलर होते. गडचिरोली पोलिसांची दमदार कामगिरी पाहता आज केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत” , असं संदीप पाटील म्हणाले.

गडचिरोली पोलिसांची दमदार कामगिरी

गोंदिया जिल्हयात गेल्या दोन वर्षांत पोलिसांनी नक्षलवाद्यांचा चांगलाच बंदोबस्त केलाय. गडचिरोली पोलीस दलाने आठ कमांडरचा खात्मा केला असून, दोन वर्षात जवळपास 97 जहाल नक्षलवाद्यांना चळवळीतून बाहेर काढलंय. यातल्या 33 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी थेट एन्काउंटर केलाय. नक्षलविरेधी अभियानाच्या या यशामुळे उद्याच्या दिल्लीतील बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक होण्याची आशा आहे.

शिवाय आजच्या बैठकीत नक्षलग्रस्त भागात रस्ते आणि मोबाईल टॉवर उभारुन विकासाचं जाळ उभारण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. पुढील नक्षलविरोधी लढ्याला बळ देण्यासाठी नवा प्लान तयार होण्याचीही नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आशा आहे.

गडचिरोली पोलिसांची गेल्या 2 वर्षांतली कामगिरी

97 नलक्षवाद्यांना चळवळीतून बाहेर काढण्यात यश
33 लोक चकमकीत मारले गेले आहेत
43 लोकांना अटक
11 लोकांनी सरेंडर केलं आहे
सगळ्यात मोठं यश 8 मोठ्या कमांडरना न्यूट्रीलाईज केलेलं आहे

अमित शहांच्या अध्यक्षतेखाली बैठक, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी आज दिल्लीत बैठक होते आहे. राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर चर्चा केली जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक हेसुद्धा बैठकीला उपस्थित असतील. बैठकीला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत ही बैठक चालेल.

(Strong performance of Gadchiroli police Against naxalism Hope to appreciate Home Minister Amit Shah CM Uddhav Thackeray)

हे ही वाचा :

Maharashtra News LIVE Update | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, नक्षलवादासंबंधी बैठकीस उपस्थित राहणार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI