Devendra Fadnavis | आशिष शेलार सरकारविरोधी भूमिका मांडतात म्हणून धमकी; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्पोट

फडणवीस म्हणाले, शेलार हे सरकारविरोधी भूमिका मांडत असतात. त्यामुळं त्यांना धमकी देण्यात आली. सरकारनं या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी.

Devendra Fadnavis | आशिष शेलार सरकारविरोधी भूमिका मांडतात म्हणून धमकी; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्पोट
देवेंद्र फडणवीस

नागपूर : भाजपचे प्रमुख नेते आशिष शेलार (Ashish Shelar) हे सरकारविरोधी भूमिका मांडतात. सरकारमधला भ्रष्टाचार ते काढत असतात. त्यामुळं त्यांना धमकी आली असेल, असा गौप्यस्फोट विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. पोलिसांनी ही बाब गांभार्यानं घ्यावी, असंही ते म्हणाले.

पोलिसांनी ही बाब गांभीर्यानं घ्यावी

आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दोन दिवसांपूर्वी फोनद्वारे देण्यात आली होती. आशिष शेलार यांनी याप्रकरणी पत्र लिहून पोलीस आयुक्ताकडे तक्रार दाखल केली. शेलार यांनी अनोळखी नंबरच्या फोनवरुन धमकी आल्याची माहिती पत्राद्वारे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. दोन वेगवेगळ्या फोन वरून शेलार यांना धमकी देण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, शेलार हे सरकारविरोधी भूमिका मांडत असतात. त्यामुळं त्यांना धमकी देण्यात आली. सरकारनं या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी.

संघ मुख्यालयाची रेकी ही अतिशय गंभीर बाब

नागपुरातील संघ मुख्यालयावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला. पाच महिन्यांपूर्वी रेकी केल्याचे उघड झाले आहे. काश्मिरात पडकलेल्या स्लीपर सेलकडून धक्कादायक खुलासा करण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, संघ मुख्यालयाची रेकी करणे ही अतिशय गंभीर बाब आहे. केंद्रीय यंत्रणा तसेच राज्य पोलीस याची गंभीर दखल घेतील.

रावसाहेब दानवेंच्या घोषणेनंतर फौजिया यांनी दाखवले रेल्वेमंत्र्याचेच पत्र, औरंगाबादच्या रेल्वे पीटलाइनचा वाद पेटला

Girish Mahajan : भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन कोरोना पॉझिटिव्ह, राजकीय नेते कोविडच्या विळख्यात

Migraine | मायग्रेनची समस्या दूर करण्यासाठी अगरबत्ती करेल मदत, जाणून घ्या गोष्ट फायद्याची

Published On - 11:39 am, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI