पिकनिकला गेले आणि जीव गमावून बसले, कन्हान नदीत तिघांना जलसमाधी

हे तिन्ही कर्मचारी परराज्यातले होते. प्रशांत राजाभाई पटेल (२३, रा. तितलागड ओडिशा), अभिषेक जितेंद्रभाई चव्हाण (२१, रा. गौजुल, गुजरात) व हरिकृष्ण वालजीभाई लिंबाचिया (२८, रा. अहमदाबाद, गुजरात) या तिघांचा बुडालेल्यांमध्ये समावेश आहे.

पिकनिकला गेले आणि जीव गमावून बसले, कन्हान नदीत तिघांना जलसमाधी
kanhan

नागपूर ः शनिवारी सुटी असल्यानं वर्धनामनगरातील स्वामीनारायण विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी पिकनिकचा बेत आखला. मौद्याजवळील वळणा येथे कन्हान नदीच्या पात्रात उतरले. पोहताना खोल पाण्यात गेल्यानं तिघे बुडाले, आठ जण थोडक्यात बचावले. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली.
हे तिन्ही कर्मचारी परराज्यातले होते. प्रशांत राजाभाई पटेल (२३, रा. तितलागड ओडिशा), अभिषेक जितेंद्रभाई चव्हाण (२१, रा. गौजुल, गुजरात) व हरिकृष्ण वालजीभाई लिंबाचिया (२८, रा. अहमदाबाद, गुजरात) या तिघांचा बुडालेल्यांमध्ये समावेश आहे.

प्रशांत पटेल यांचा मृतदेह सापडला आहे. अभिषेक चव्हाण संगीत शिकवायचे. तर प्रशांत पटेल व हरिकृष्ण लिंबाचिया हे शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत होते. शनिवारी सुटी असल्याने या तिघांसह एकूण ११ जण वळणा येथील स्वामीनारायण गोरक्षण येथे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पिकनिकसाठी आले होते.

आठ जण बाहेर निघाले

गोरक्षणलगत कन्हान नदी वाहते. सर्व जण या भागात फिरण्यासाठी गेले. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पोहण्यासाठी हे सर्व जण पात्रात उतरले. यातील कुणालाही पोहता येत नव्हते. पात्रात खोल खड्डा असल्याची माहिती कुणालाच नव्हती. प्रशांत, अभिषेक व हरिकृष्ण त्याच खड्डय़ात शिरले. पोहता येत नसल्याने ते बुडायला लागले. हे पाहून उर्वरित आठ जणांनी आरडाओरडा केला. ते ऐकून परिसरातील नागरिक धावून आले. त्यांनी तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही.

दरम्यान, या पात्रात पोहत असताना तीन जण बुडाले असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी मुख्तार बागवान, ठाणेदार हेमंत खराबे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते. रविवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू झाले. स्वामीनारायण विद्यालय हे स्वामीनारायण मंदिर ट्रस्टच्या वतीने संचालित केले जाते. हे सर्व जण ट्रस्टच्या वाठोडा, नागपूर येथील क्वॉर्टरमध्ये राहायचे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

चिमुकल्याचा गेला तलावात तोल

मेलेल्या उंदराला कुतूहलाने बघण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याचा तलावात तोल गेला. यातच तलावात बुडून चिमुकल्याचा हकनाक बळी गेला. शनिवारी दुपारी उमरेड येथील हिरवा तलावात ही घटना घडली. सानिध्य दिनेश बावनकुळे असे या चार वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे. मंगळवारी पेठ येथील दिनेश बावनकुळे हे मोलमजुरीची कामे करतात. नेहमीप्रमाणे दिनेश सकाळीच बाहेर गेले. दरम्यान, सकाळी नऊ वाजताच्या सुमारास एका इसमाने घरातील मेलेला उंदीर पकडून तो हिरवा तलावाकडे नेला. त्या माणसाच्या अगदी मागोमाग सानिध्यसुद्धा गेला. सानिध्य तलावाशेजारीच खेळत बसला. अशात तोल गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

खुर्चीला हात-पाय बांधून गळा चिरला, नागपुरात 78 वर्षीय महिलेची घरात निर्घृण हत्या

Tiger बल्लारपूरच्या जंगलात कसा झाला वाघिणीचा मृत्यू? चार दिवसांपासून वनविभागाला पत्ताच नाही

पती-पत्नीचा वाद, महिलेचा मृतदेह सापडला, बाजूला चिमुकली धाय मोकलून रडत होती 

 

Published On - 11:16 am, Sun, 28 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI