AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाव बुडाल्याने नागपूरच्या कुहीत पाच महिला बुडाल्या, एकीचा मृत्यू, तर तिघींची प्रकृती चिंताजनक

नागपूरच्या कुही येथे नावेतून जात असताना नाव उलटून पाच महिला बुडाल्या. या पैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन महिलांची प्रकृती गंभीर आहे. तर एक महिला बचावली आहे.

नाव बुडाल्याने नागपूरच्या कुहीत पाच महिला बुडाल्या, एकीचा मृत्यू, तर तिघींची प्रकृती चिंताजनक
boat sank in gosekhurd backwater
| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 5:19 PM
Share

नागपूर: नागपूरच्या कुही येथे नावेतून जात असताना नाव उलटून पाच महिला बुडाल्या. या पैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन महिलांची प्रकृती गंभीर आहे. तर एक महिला बचावली आहे. या घटनेमुळे सदर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नागपूर जिल्ह्यातील कुही येथे आज सकाळी पाच महिला पाण्यात बुडाल्या. गोसेखुर्दच्या बॅक वॉटरमधून नावेतून जात असताना नाव बुडाल्याने ही दुर्देवी घटना घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तीन महिला अत्यवस्थ असून त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पाचही महिला मिरची तोडणी आणि कापूस वेचणीच्या कामाला जात होत्या. त्यावेळी ही दुर्घटना घडली. ही घटना घडता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून दुर्घटनेचा तपास सुरू केला आहे.

दीड वर्षाच्या बाळाची आईच दगावली

या दुर्घटनेत गीता रामाजी निंबर्ते यांचा मृत्यू झाला आहे. गीता यांना दीड वर्षाचा मुलगा आहे. घरी मुलगा, पती आणि त्याच होत्या. आता त्यांचा मृत्यू झाल्याने या मुलाच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या सर्व महिला मौजा कुजबा येथील असल्याचं सांगितलं जात आहे.

असा झाला अपघात

या पाचही महिला कापूस वेचण्यासाठी आणि मिरची तोडणीसाठी आम नदी ओलांडून जात होत्या. शेतमालक परमानंद तिजारे यांच्या शेतातून त्या नावेने जात होत्या. नदीच्या पात्रात अचानक नाव फुटली. त्यामुळे नावेत पाणी शिरले आणि नाव बुडाली. या महिलांना बचावासाठी आरडोओरड केली. मात्र, त्यांना नागरिक बचावाला जाण्यासाठी जाईपर्यंत नाव बुडाल्याने या महिला गंटागळ्या खात होत्या. त्यातील गीता रामदास निंबारते यांचा मात्र बुडून मृत्यू झाला. मनू सुरेश साळवे, मनीषा राजू ठवकर, लक्ष्मी लोमेश्वर गिरी, मंगला देवराव भोयर व परमानंद रामचंद्र तिजारे या चार महिला वाचल्या आहेत. मात्र यातील दोघींवर मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर लक्ष्मी लोमेश्वर गिरी व परमानंद रामचंद्र तिजारे यांच्यावर नागपूर मेडिकलमध्‍ये उपचार सुरू आहेत.

जीवघेणा बॅकवॉटर

दरम्यान, गोसेखुर्दचा बॅकवॉटर येथील नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. यापूर्वीही या बॅकवॉटरमध्ये पडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. गावातून बाहेर जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने या बॅकवॉटरमधूनच जावे लागत आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग बनविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

संबंधित बातम्या:

नेतेमंडळींनो बोलताना जरा जपूनच… तुमच्यावर मोबाईल कॅमेराची बारीक नजर!, सायबर तज्ज्ञांचा पुढाऱ्यांना मोलाचा सल्ला

MLA Krishna Khopde | कोरोनाबाधित आमदार आंदोलनात, नागपूर मनपाने बजावली नोटीस; कृष्णा खोपडेंचं स्पष्टीकरण काय?

Vijay Vadettiwar | विदर्भात सर्वात जास्त जागा काँग्रेसलाच, विजय वडेट्टीवार यांचा दावा; भाजपला सत्तेपासून दूर नेणारा कल?

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.