AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईच्या शोधात विदर्भाच्या ‘वॉकर’ची 13 महिने भटकंती, थक्क करणारा तीन हजार किलोमीटरचा प्रवास, वर्ल्ड रेकॉर्डची नोंद

एक वाघ आपल्या आईपासून वेगळा झाला अन् मग त्याने आईच्या शोधासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास केला.

आईच्या शोधात विदर्भाच्या 'वॉकर'ची 13 महिने भटकंती, थक्क करणारा तीन हजार किलोमीटरचा प्रवास, वर्ल्ड रेकॉर्डची नोंद
| Updated on: Jul 30, 2022 | 7:42 AM
Share

नागपूर : आईसाठी वाट्टेल ते करणारे लोक आपण पाहिलेत पण आईच्या शोधात हजारो किलोमीटरचा प्रवास करणारा वाघ पाहिलाय का? एक वाघ आपल्या आईपासून वेगळा झाला अन् मग त्याने आईच्या शोधासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास केला. आईपासून वेगळा झालेल्या ‘वॉकर’ (Walker Tiger) नावाच्या वाघाच्या बछड्याने 13 महिन्यात 3 हजार 17 किलोमीटर भटकंती केल्याचं समोर आलं आहे. एका अभयारण्यातून दुसऱ्या अभयारण्यापर्यंत त्याचा प्रवास झाला. संपूर्ण जगात आतापर्यंत कोणत्याही वाघाने इतकी भटकंती केलेली नाही. तो विक्रम ‘वॉकर’च्या नावावर नोंदला गेला. सतत भटकंती करणारा हा ‘वॉकर’ आहे विदर्भाच्या यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील (Tipeshwar Sanctuary). तेथील ‘टी1सी’ हा वाघ ‘वॉकर’ नावाने प्रसिद्ध आहे. तीन हजार किलोमीटर भटकंती करणारा हा वाघ अवघा तीन वर्षांचा आहे. वन विभागाने लावलेल्या कॉलर आयडी टॅगमुळे त्याचा हा अनोखा प्रवास मोजणं शक्य झालं.

2019 च्या फेब्रुवारी महिन्यापासून ‘वॉकर’ च्या या प्रवासाला सुरुवात झाली. टिपेश्वर अभयारण्यापासून भटकत तो वर्षभरातच ज्ञानगंगा अभयारण्यापर्यंत पोहोचला. विशेष म्हणजे एकाच क्षेत्रात जास्त दिवस न राहता तो विविध ठिकाणी भटकत राहिला. ज्ञानगंगा अभयारण्यात भक्ष्याची कमतरता नसतानाही तो अजिंठ्याकडे वळल्याचं दिसले. त्यामागे आईचा शोध घेणं हे कारण असल्याचं बोललं जात आहे.

‘वॉकर’ च्या रेडिओ कॉलरची बॅटरी 13 महिन्यांनंतर म्हणजे 28 मार्च 2020 ला संपली. तोपर्यंतच्या 13 महिन्यांत त्याने 3 हजार 17 किलोमीटर अंतर कापल्याची नोंद झाली. बॅटरीच्या समस्या आणि आगामी काळात कॉलर गळ्यात घट्ट होण्याचा धोका लक्षात घेता ड्रॉप ऑफ वापरून त्याची कॉलर काढण्यात आली. वॉकर ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात असताना ही कॉलर काढण्यात आली. 15 सप्टेंबर 2015 रोजी 2 वाघांना कॉलर आयडी लावण्यात आला. परंतु तो प्रयोग फसल्यानंतर 25 नोव्हेंबर 2015 रोजी नव्याने पुन्हा लावण्यात आला. त्यातही बिघाड झाल्यानंतर 18 मार्च 2016 रोजी परत नवा लावण्यात आला. मात्र महिनाभरात तोही बिघडला. वाघांचा प्रवास कळावा म्हणून 17 मार्च 2016 रोजी आणखी 15 वाघांना कॉलर आयडी लावण्यात आला.

विदर्भातील वाघांचा कॉरिडॉर निश्चित

वॉकरमुळे विदर्भातील वाघांचा कॉरिडॉर निश्चित झाला आहे. याचा उपयोग वाघांच्या संरक्षणासाठी आणि पर्यटकांच्या नियोजनासाठी निश्चितपणे होण्यास मदत मिळणार आहे. वाइल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने यापूर्वी ताडोबा अंधारीतील 5 वाघांना 19 ऑक्टोबर 2014 रोजी कॉलर आयडी टॅग लावला होता. तो 19 मार्च 2016 रोजी काढून टाकण्यात आला. वाघांच्या प्रवासाच्या अनेक नोंदी आहेत. परंतु एवढ्या कमी कालावधी एवढे अंतर पार करणारा हा पहिलाच वाघ असल्याचं वाइल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. बिलाल हबीब यांनी सांगितलं आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.