AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईव्हीएममधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताचं भाजपनं मशिन्स जाळल्या…नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी” याच म्हणीचा वापर करत भाजप आणि मोदी सरकार देशात कारभार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ईव्हीएममधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताचं भाजपनं मशिन्स जाळल्या...नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप
NANA PATOLEImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 14, 2026 | 9:44 PM
Share

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  “ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी” याच म्हणीचा वापर करत भाजप आणि मोदी सरकार देशात कारभार करत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेवर आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नाना पटोले म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगापासून ते संपूर्ण निवडणूक मॅनेजमेंट आणि ‘मॅच फिक्सिंग’ ही भाजपच्या बाजूनं करण्याचा प्रयत्न झाला. हे चित्र संपूर्ण देश आणि पश्चिम बंगालची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत होती. हे संपूर्ण प्रकरण आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार आणि गडबड करण्यात आली ही बाब आता लोकांसमोर उघड होत आहे, हे समजताच पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकारनं ईव्हीएम मशिन्सच जाळून टाकल्याचा थेट आरोप पटले यांनी केला आहे.

दरम्यान पंढरपूरमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर आमदार रोहित पवार यांचं आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाला देखील नाना पटोले यांनी पाठिंबा दिला आहे. रोहित पवार यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. भाजपच्या २०१४ ते २०१९ या काळातील फडणवीस सरकारनं २०१६ मध्ये जाहीर केलेली कर्जमाफी ही निव्वळ फसवणूक होती, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. सरकार बदलले तरी अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण झालेली नाही, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन रोहित पवार यांचं पंढरपूरमध्ये आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांकडून जबरदस्तीनं आधी एवढे पैसे भरा, मगच तुमची कर्जमाफी होईल अशा अटी घातल्या जात आहेत. यामुळे प्रत्यक्ष कर्जमाफ होण्याऐवजी शेतकऱ्यांच्या खिशातूनच पैसे काढून घेतले जात आहेत. ही अत्यंत क्लेशदायक बाब असून प्रत्यक्षात बँकांचे कर्ज माफ होताना कुठेही दिसत नसल्याचा आरोपही यावेळी नाना पटोले यांनी केला.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी