”तो शिवसेनेचा कलेक्टर, त्याच्या उत्पन्नातून एसटी चालेल एवढं त्याने कमावलंय”, नारायण राणेंचा प्रहार

सिंधुदुर्गात नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. एसटी कर्मचारी आत्महत्या करतायत, पगार कित्येक महिने नाही ही एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था आहे. रस्त्यावर येण्याची परवानगी असता कामा नये, अशा गाड्या झाल्यात. त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढं त्यानं कमावलंय.

''तो शिवसेनेचा कलेक्टर, त्याच्या उत्पन्नातून एसटी चालेल एवढं त्याने कमावलंय'', नारायण राणेंचा प्रहार
narayan rane

सिंधुदुर्गः भाजपचे नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणेंनी पुन्हा एकदा नाव न घेता परिवहन मंत्री अनिल परबांवर निशाणा साधलाय. एसटी कर्मचाऱ्यांची वाईट अवस्था आहे ते आत्महत्या करतायत, पगार नाही, खरं तर त्याच्या उत्पन्नातून एसटी चालू शकते येवढं त्यानं कमवलंय, असं सांगत नारायण राणेंनी अनिल परबांवर हल्ला चढवलाय.

पगार कित्येक महिने नाही ही एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था

सिंधुदुर्गात नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. एसटी कर्मचारी आत्महत्या करतायत, पगार कित्येक महिने नाही ही एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था आहे. रस्त्यावर येण्याची परवानगी असता कामा नये, अशा गाड्या झाल्यात. त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढं त्यानं कमावलंय. सगळ्यांचे पैसे तो गोळा करतो. तो शिवसेनेचा कलेक्टर आहे ही उद्याची हेडलाईन आहे, असंही म्हणत नारायण राणेंनी नाव न घेता अनिल परबांवर प्रहार केलाय.

कोण काय न करता जागा बदलणार म्हणण्यात काय अर्थ?

सी वर्ल्ड आहे त्याच जागेवर होणार आहे. कोण काय न करता जागा बदलणार म्हणण्यात काय अर्थ आहे. सी वर्ल्ड पण त्याच जागेवर होणार आहे. नाणार प्रकल्प पण त्याच जागेवर होणार आहे. हे दोन्ही प्रकल्प त्याचं जागी होणार असल्याची घोषणा नारायण राणेंनी केली.

संप काळातच एसटी बस चालकाची आत्महत्या

राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संप काळातच एसटी बस चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये उघडकीस आलीय. एसटीच्या मागील बाजूला एसटी ड्रायव्हरने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी समोर आला होता. अहमदनगरमध्ये शेवगाव येथील एसटी चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटी बसला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली होती. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोण होता मयत एसटी कर्मचारी?

शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे (वय 50 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. काकडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा पुण्यात कंपनीमध्ये आहे, तर दुसरा मुलगा संस्थेमध्ये नोकरी करत असून मुलीचे लग्न झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. त्यातच ही आत्महत्या करण्यात आली आहे. मात्र आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच आगराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी डेपोत धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. ही घटना समजताच मोठी खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

संबंधित बातम्या :

एसटी चालकाची बसमध्येच आत्महत्या, बॅगच्या बेल्टने गळफास

पगार न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, एसटी संघटनेकडून आंदोलनाची हाक

narayan rane criticism on anil parab st loss issue

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI