AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डब्ब्यात 22 रुद्राक्ष, अंकांची पट्टी अन्… भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रॉपर्टीवर छापा, SIT ला काय काय सापडले?

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातच्या कार्यालयावर SIT कडून छापेमारी करण्यात आली असून, अघोरी विद्येसाठी वापरले जाणारे संशयास्पद साहित्य जप्त झाले आहे. लैंगिक शोषणाच्या तिसऱ्या गुन्ह्यात आज त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.

डब्ब्यात 22 रुद्राक्ष, अंकांची पट्टी अन्... भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रॉपर्टीवर छापा, SIT ला काय काय सापडले?
ashok kharat
| Updated on: Apr 09, 2026 | 8:31 AM
Share

महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असलेला स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याचे काळे कारनामे एकामागून एक बाहेर पडताना दिसत आहेत. आता भोंदू बाबा अशोक खरातच्या भोवती पोलिसांनी फास आवळण्यास सुरुवात केली आहे. आता विशेष तपास पथकाने (SIT) खरातच्या ओकस प्रॉपर्टी या कार्यालयावर छापेमारी केली आहे. या छापेमारीत केवळ प्रॉपर्टीचे व्यवहारच नाही तर अघोरी विद्येचा वापर होत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. या कारवाईमुळे नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

कार्यालयातील त्या डब्यात काय आढळले?

यावेळी तपासादरम्यान पोलिसांना खरातच्या कार्यालयातून अत्यंत संशयास्पद वस्तू मिळाल्या आहेत. ज्याचा वापर जादूटोण्यासारख्या कृत्यांसाठी केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या जप्त साहित्यामध्ये विविध गोष्टींचा समावेश आहे. पोलिसांना त्याच्या ऑफिसमध्ये इंग्रजीतील A ते Z अक्षरे आणि १ ते २६ अंक लिहिलेली एक विशेष पट्टी सापडली आहे. याचा वापर सहसा मृतात्म्यांशी संवाद साधण्यासाठी किंवा ‘प्लॅन्चेट’ सारख्या अघोरी प्रकारांसाठी केला जातो.

त्यासोबतच एका डब्यातून २२ रुद्राक्ष आणि भिंगाची काच जप्त करण्यात आली आहे. तसेच एका बाटलीत हिरव्या मळकट रंगाचे संशयास्पद पातळ द्रव्य सापडले आहे. हे सध्या रासायनिक विश्लेषणासाठी पाठवले जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच शिवनिका संस्थान या नावाचे कोरे पावती पुस्तकही पोलिसांच्या हाती लागले आहे, ज्यातून आर्थिक फसवणुकीचा धागा समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तिसऱ्या गुन्ह्यात आज कोर्टात हजेरी

अशोक खरातवर आतापर्यंत पुणे, नाशिकसह अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल केले आहेत. यातील दोन गुन्ह्यांत तो आधीच अटकेत आहे. आता तिसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी SIT त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार आहे. जप्त करण्यात आलेल्या या नवीन पुराव्यांच्या आधारे पोलीस पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करण्याची दाट शक्यता आहे.

अशोक खरात हा ओकस प्रॉपर्टीच्या नावाखाली आपले कार्यालय चालवत होता. मात्र, प्रत्यक्षात तिथे धर्माचा आधार घेऊन महिलांना वश करणे आणि त्यांचे शारीरिक व आर्थिक शोषण करणे, असे गंभीर प्रकार सुरू असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. अशोक खरातने शिवनिका संस्थानच्या नावाने किती लोकांची फसवणूक केली आणि गोळा केलेल्या पैशांचा कुठे कुठे वापर केला, याचा तपास आता वेगाने सुरू आहे.

Follow Us
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ.
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा.
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान..
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान...
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून...
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून....
अवकाळीच्या 'अवकृपे'ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं
अवकाळीच्या 'अवकृपे'ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं.
राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी! पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच
राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी! पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच.
भोंदू खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण
भोंदू खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण.
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन.
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत.
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या.