पोलीस नव्हे ते देवदूत! नाशकात गर्भवती महिलेसाठी अर्ध्यारात्री पोलीस धावून आले आणि दोन्ही जीव वाचले

एका महिलेला प्रसूती वेदना होत होत्या आणि ती मदतीसाठी विनवणी करत होती.

पोलीस नव्हे ते देवदूत! नाशकात गर्भवती महिलेसाठी अर्ध्यारात्री पोलीस धावून आले आणि दोन्ही जीव वाचले
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 5:58 PM

नाशिक : नाशिकमध्ये गंगापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मध्यरात्री गर्भवती महिलेला मदत मिळाली आहे (Police Help Pregnant Woman). यामुळे आई आणि बाळ दोघांचाही जीव वाचला आहे. नाशिक पोलिसांच्या या कार्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे (Police Help Pregnant Woman).

नाशिकमधील गंगापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पवार आणि हवालदार उगले हे मध्यरात्रीच्या सुमारास गंगापूर हद्दीत दुचाकीवर पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंक करत असताना रात्री 3 वाजेच्या सुमारास गंगापूर गावातून रस्त्याने चार लोक येताना दिसली.

या लोकांना बघून पोलिसांना ते चोर असल्याची शंका आली. त्यामुळे पोलिसांनी या लोकांजवळ जाऊन विचारण्या करण्याचा निर्णय घेतला. मात्र, जवळ गेले असता चौकशी केली तर यापैकी एका महिलेला प्रसूती वेदना होत होत्या आणि ती मदतीसाठी विनवणी करत होती. तिचे वृद्ध सासू-सासरे आणि पती मदतीसाठी याचना करत होते.

ही गंभीर बाब पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांना माहिती दिली. नियंत्रण कक्षाला कळवलं आणि लगेच वाहन पाठवा असं सांगितलं. नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनीही प्रसंगाची गंभीरता ओळखून एक क्षणाचाही विलंब न करता पोलीस वाहन तात्काळ गंगापूरच्या दिशेने पाठवले (Police Help Pregnant Woman).

काहीच वेळात पोलिसांनी पाठवलेलं वाहन गंगापूर येथे पोहोचलं. वाहन बघताच भारतीच्या वृद्ध सासू-सासऱ्यांच्या डोळ्यात खळकन पाणी आलं. तात्काळ भारतीला पोलीस वाहनात टाकून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पवार आणि त्यांच्या पथकाने गिरणाने येथील आरोग्य केंद्रात दाखल केल. अवघ्या 20 मिनिटांत भारतीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आपल्या मदतीसाठी देवदूतच धावून आले म्हणून या परिवाराने या पोलीस पथकाचे आभार मानले आहे.

Police Help Pregnant Woman

संबंधित बातम्या :

इगो बाजूला ठेवा, पोलिसांवर दबाव आणू नका, देवयानी फरांदेंना नाशिक पोलीस आयुक्तांचा रोखठोक इशारा

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.