AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुंगीचं पाणी पाजलं, लाईट बंद केल्या, ‘मी कृष्ण, तू माझी राधा…’ म्हणत भोंदूबाबाने इतके वर्ष महिलेवर केले अत्याचार

Ashok Kharat : भोंदूबाबाचं काळं कृत्य, महिलेल्या पतीच्या बाहेर काढलं... तिला गुंगीचं पाणी पाजलं... लाईट बंद केल्या आणि, 'मी कृष्ण, तू माझी राधा...' म्हणत बलात्कार, 'त्या' काही मिनिटांत नक्की काय घडलं... धक्कादाक आहे सत्य

गुंगीचं पाणी पाजलं, लाईट बंद केल्या, 'मी कृष्ण, तू माझी राधा...' म्हणत भोंदूबाबाने इतके वर्ष महिलेवर केले अत्याचार
Ashok Kharat
| Updated on: Mar 22, 2026 | 10:58 AM
Share

Ashok Kharat : भक्ती आणि श्रद्धेच्या नावावर महिल्यांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याचा खरा चेहरा अखेर समोर आला आहे. अशोक खरात याने भक्तीच्या जाळ्यात अनेक महिलांना अडकवत त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले… 17 तारखेल भोंदूबाबाला अटक करण्यात आली… सांगायचं झालं तर, 24 वर्षीय डी – फार्मसी करणाऱ्या विवाहित महिलेला देखील खरात याने आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, महिला पतीसोबत बाबाचे आशीर्वाद घेण्यासाठी खरातच्या ऑफिसमध्ये आलेली… अशोक खरात याने दोघांना सांगितलं, ‘तुमच्या नात्याला नजर लागली आहे… नजर दूर करणं फार गरजेचं आहे… नाही तर महिलेच्या जीवाला धोका आहे…’, त्यानंतर बाबाने त्यांना प्लास्टीकच्या बाटलीत पाणी दिलं… आणि बाटली तीन दिवस बेडरुममध्ये ठेवण्यास सांगितली. बाबाने असं देखील सांगितलं की, पाणी काळं झालं की नजर निघून जाईल…

लोकांकडून बाबाबद्दल अनेक चांगल्या गोष्टी ऐकल्यामुळे जोडप्याचा देखील भोंदूबाबावर विश्वास बसला… त्यानंतर बाबाने महिलेच्या पतीला ऑफिस बाहेर पाठवलं आणि महिलेला दरवाजा बंद करण्यास सांगितला… त्यानंतर महिलेला तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्यास सांगितलं. पाण्याची चव खारट आणि कडू होती… पाणी पिल्यानंतर महिलेला चक्कर आली… याच दरम्यान, बाबा महिलेला म्हणाला, ‘जेवढं जास्त पाणी पिणार तेवढं चांगळं फळ मिळेल…’

त्यानंतर बाबाने महिलेला पाण्याचा ग्लास डोक्यावर ठेवून डोळे बंद करुन गायत्री मंत्राचा जप करण्यास सांगितलं… महिलेने देखील बाबा सांगतोय तसं केलं… त्यानंतर बाबाने ऑफिसमधील लाईट बंद केल्या, महिलेला मागून पकडलं आणि तिच्यासोबत बळजबरी केली… एवढंच नाही तर, बाबा म्हणाला, ‘मी तुझा कृष्ण आणि तू माझी राधा…’

घडलेल्या घटनेनंतर बाबाने महिलेला धमकी दिली… जर याबद्दल कोणाला काहीही सांगितलं तर, नवऱ्याला मारून टाकेल… बाबाची भीती आणि लोकांचा त्याच्यावर असलेल्या विश्वासामुळे महिला घाबरली… अनेक वर्ष महिला सर्वकाही सहन करत होती… त्यानंतर महिलेचं एका कॉलेजमध्ये प्रवेश झाला…

तेव्हा बाबा म्हणाला, प्रत्येक परीक्षेपूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी यावं लागेल. अशाप्रकारे, 2023 ते डिसेंबर 2025 पर्यंत बाबाने अनेकदा महिलेला ऑफिसमध्ये बोलावलं आणि तिच्यावर अत्याचार केले. अखेर, 2026 मध्ये महिलेच्या एका नातेवाईकाने सांगितलं, तो भोंदूबाबा आहे आणि अनेक महिलांवर त्याने अत्याचार केले आहेत…

सुरुवातीला महिला प्रचंड घाबरलेली होती… पण नातेवाईकांनी साथ दिल्याने महिलेने नाशिक शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आणि बाबाचं काळं सत्य समोर आलं… याच आधारे पोलिसांनी बाबाला 17 मार्च रोजी अटक केली. आता याप्रकरणी अधिक चैकशी सुरु आहे.

Follow Us
रुपाली चाकणकर यांनी एक वर्षांपूर्वी खरातला वाचवले- रुपाली ठोंबरे पाटील
रुपाली चाकणकर यांनी एक वर्षांपूर्वी खरातला वाचवले- रुपाली ठोंबरे पाटील.
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?.
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.