AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, जिल्ह्यातील 261 गावे कोरोनामुक्त

रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत असल्याने वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने ऑक्सिजन बेड देखील रिकामे झालेत. Nashik District Coronation Free

नाशिकची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, जिल्ह्यातील 261 गावे कोरोनामुक्त
Corona
| Edited By: | Updated on: Jun 04, 2021 | 4:06 PM
Share

रईस शेख, टीव्ही 9 मराठी, मालेगाव

नाशिक: जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून दिलासा देणारी बातमी समोर आलीय. लॉकडाऊन आणि शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आल्यामुळे मालेगाव, मनमाडसह कसमादे भागात कोरोना आटोक्यात येत असून, तब्बल 261 गावे कोरोनामुक्त झालीत, तर अनेक गावं कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत. रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत असल्याने वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने ऑक्सिजन बेड देखील रिकामे झालेत. (Nashik Journey Towards Coronation, 261 Villages In The District Are Coronation Free)

नाशिकमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरापासून तर गावखेड्यापर्यंत गेल्या दोन महिन्यांपासून धुमाकूळ घातला होता. शहरपाठोपाठ ग्रामीण भागातही रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत होते. अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड न मिळाल्याने त्यांचा मृत्यूदेखील झाला आहे. मात्र आता परिस्थितीत बदल झाला असून, रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत मालेगावात तालुक्यातील 61, तर मनमाड- नांदगाव तालुक्यातील 61 गाव कोरोनामुक्त झाल्याचे मालेगावचे तहसीलदार चंद्रजित राजपूत आणि नांदगावचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. ससाणे यांनी सांगितले.

गावात कोरोना रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली

गावात कोरोना रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती, त्यानंतर आम्ही गावात कोरोनाचे नियम काटेकोर पणे पालन करण्यास सुरुवात करत गावात होणारे लग्न सोहळे थांबवले आणि गावात वेळोवेळी औषध फवारणी करून सर्वेक्षण करत ग्रामस्थांची तपासणी केली आणि त्यामुळे आमचा गाव कोरोनामुक्त झाल्याचे करही गावचे सरपंच दत्तू घुगे सांगतात. गाव जरी कोरोनामुक्त झाले असले तरी कोरोना संपलेला नसून नागरिकांनी योग्य खबरदारी घेत नियमांचे तंतोतंत पालन केल्यास नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही.

कोरोनामुक्त झालेले गावे

मालेगाव तालुका -61 मनमाड-नांदगाव तालुका -61 चांदवड तालुका -50 बागलाण तालुका-81 देवळा तालुका -8 एकूण – 261

संबंधित बातम्या

ICU साठी 4 ते 7 हजार, व्हेंटिलेटरसाठी 9 हजारापर्यंत दर, कोरोना उपचारासाठी सरकारकडून दर जाहीर

Nashik Journey Towards Coronation, 261 Villages In The District Are Coronation Free

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.