AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांद्याची होळी करत बळीराजा ढसाधसा रडला, आमच्याच वाट्याला हे दु:ख का? म्हणत बळीराजा संतापला…

कांद्याच्या भावात सतत होत असलेली घसरणीला वैतागून येवल्याच्या मातुलठाण येथील शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत दीड एकर कांदा पिकाला अग्निडाग देऊन होळी साजरी केली आहे.

कांद्याची होळी करत बळीराजा ढसाधसा रडला, आमच्याच वाट्याला हे दु:ख का? म्हणत बळीराजा संतापला...
Image Credit source: Google
| Updated on: Mar 06, 2023 | 12:27 PM
Share

चंदन पूजाधिकारी / उमेश पारिक, टीव्ही 9 मराठी, येवला : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव ( Onion Rate ) मोठ्या प्रमाणात घसरले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील ( Nashik Farmer ) शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत. नुकताच नाशिक मधील येवला तालुक्यातील मातुलठाण या गावातील शेतकर्‍यांनी कांद्याची होळी ( Onion Holi ) करत संताप व्यक्त केला आहे. पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेला कांद्याच्या पिकाचे झालेलं नुकसान बघून शेतकऱ्यांना अश्रु अनावर झाले आहे. कांद्याची होळी करत शेतकऱ्यांनी उद्विग्न प्रतिक्रिया देत आमचं मुल गेल्यासारखं दुःख आम्हाला होत असल्याची भावना या वेळेला शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नाशिक जिल्हा हा कांद्याची पंढरी म्हणून संपूर्ण आशिया खंडात ओळखला जातो. कांद्याची बाजारपेठ म्हणून लासलगाव बाजार समिती ही सर्वांना परिचित आहे. मात्र, याच बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहे. 400 ते 500 रुपयांपर्यंत चे कांद्याचे सरासरी भाव शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणत आहेत.

कांद्याचे दर वाढवून द्यावे, निर्यात खुली करावी, कांद्याला अनुदान द्यावे अशा प्रकारची मागणी गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामध्ये मागील आठवड्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समिती मध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडले होते.

इतकेच काय तर काही शेतकऱ्यांनी कांद्याचे भाव वाढवण्यासाठी रास्ता रोको देखील केला होता. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कांदा मोठ्या प्रमाणात पिकवत असल्यानं सध्याच्या घडीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. ठीक ठिकाणी निदर्शने देखील केली आहे.

त्याचाच एक भाग म्हणजे होळीचा सण साजरा केला जात आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कांद्याची होळी करत सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी होळीचे औचित्य साधून कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने त्याच्या शेतातील दीड एकर कांदा पिकाला अग्निडाग देऊन आगळे-वेगळे आंदोलन केले.

कांदा उत्पादक शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी टोकाचे पाऊल उचलत शेतात ठिकठिकाणी सरण रचून कांदा पेटवून देत संताप व्यक्त केला. शासनाने आता तरी दखल घेऊन कांद्यासोबत इतर शेतमालाला योग्य भाव द्यावा अशी मागणी डोंगरे यांनी केली आहे. कांद्याची होळी करत असतांना परिसरातील शेतकरीही उपस्थित होते.

नाशिक मध्ये सध्या कांद्याचा मुद्दा अधिकच पेटला असून ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहे. कांद्याचे दर दररोज घसरत असल्याने कांदा उत्पादक अधिकच आक्रमक होत आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.