20 वर्षानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच एकनाथ खडसेंच्या घरी; भेटीनंतर केलं मोठं विधान!

राजकारणातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील संवादाला सुरुवात झाली आहे. (gulabrao patil)

20 वर्षानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच एकनाथ खडसेंच्या घरी; भेटीनंतर केलं मोठं विधान!
gulabrao patil
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 2:06 PM

जळगाव: राजकारणातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील संवादाला सुरुवात झाली आहे. 20 वर्षात पहिल्यांदाच गुलाबराव पाटील हे खडसेंच्या मुंबईतील घरी गेले. यावेळी दोघांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या भेटीनंतर गुलाबराव पाटील यांनी मीडियाशी संवादही साधला. खडसेंना शह देण्याची या मागची कोणतीही खेळी नसल्याचं गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं. (after 20 years gulabrao patil met eknath khadse, discuss on jalgaon District Banks election)

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी यात पुढाकार घेतला आहे. याशिवाय सहकार क्षेत्रात वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचीही निवडणूक बिनविरोध करण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. स्वतः गुलाबराव पाटील हे सुध्दा नेत्यांच्या भेटी घेत आहेत. जळगाव जिल्हा बँकेवर सध्या एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे. पाटील यांनी नुकतीच खडसेंच्या मुंबईच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. 20 वर्षात प्रथमच आपण खडसेंच्या मुंबईच्या घरी गेलो, असं पाटील यांनी या भेटीनंतर स्पष्ट केलं.

चर्चांना पूर्णविराम

मात्र दुसरीकडे खडसे यांच्या नेतृत्वाला शह देण्यासाठी पाटील यांची खेळी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. या बाबत पत्रकारांनी थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारला असता, खडसेंना शह देण्याची कोणतीही खेळी नाही, जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपले प्रयत्न आहेत. यासाठीच आपण गेल्या 20 वर्षात प्रथमच एकनाथराव खडसे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी गेलो होतो, असं ते म्हणाले.

प्रारुप याद्या तयार

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुका 31 ऑगस्टनंतर तातडीने घेण्यात याव्या यासाठी प्रारुप मतदार याद्या तयार करण्याचे आदेश 9 ऑगस्ट रोजी काढण्यात आले आहेत. जिल्हा बँकेची प्रारुप मतदार यादी तयार करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे सहकार विभागाने आताच आदेश काढले आहेत. कोरोनामुळे राज्यातील 31 पैकी 13 जिल्हा बँकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यात सातार आणि उस्मानाबाद जिल्हा बँकेचा समावेश आहे. (after 20 years gulabrao patil met eknath khadse, discuss on jalgaon District Banks election)

संबंधित बातम्या:

राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजणार? जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे सहकार विभागाचे आदेश

जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोना वाढणार, अजितदादांचा दावा; केंद्र सरकारवरही टीका

दर्शन घेण्याएवढे बाळासाहेब थोर आहेत, मग त्यांच्याच संपत्तीची चौकशीची मागणी का केली? : दीपक केसरकर

(after 20 years gulabrao patil met eknath khadse, discuss on jalgaon District Banks election)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.