AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी भाजपचे वरिष्ठ नेते, आता नाशिकच्या महापौरांपासून सर्व पदाधिकारी दिल्लीत, वाचा नेमकं कारण काय?

भाजप नेत्यांच्या दिल्ली वारी वाढल्या आहेत. सर्वच नेते दिल्ली दरबारी जात असल्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता नाशिकचे महापौर, सर्व आमदार, स्थायी समिती सभापती आणि सर्व पदाधिकारी दिल्लीत दाखल झालेत. त्यामुळे भाजपच्या दिल्ली वारीत नेमकं दडलंय काय? याचीच चर्चा होतेय.

आधी भाजपचे वरिष्ठ नेते, आता नाशिकच्या महापौरांपासून सर्व पदाधिकारी दिल्लीत, वाचा नेमकं कारण काय?
BJP
| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 10:43 AM
Share

नाशिक : भाजप नेत्यांच्या दिल्ली वारी वाढल्या आहेत. सर्वच नेते दिल्ली दरबारी जात असल्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता नाशिकचे महापौर, सर्व आमदार, स्थायी समिती सभापती आणि सर्व पदाधिकारी दिल्लीत दाखल झालेत. त्यामुळे भाजपच्या दिल्ली वारीत नेमकं दडलंय काय? याचीच चर्चा होतेय.

नाशिकच्या सर्व पदाधिकाऱ्यांची जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या दालनात या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत नाशिकला नमामी गंगा प्रकल्पासाठी निधीची मागणी करण्यात येणार आहे.

देवेंद्र फडणवीस अमित शाह बैठक

दरम्यान, 9 ऑगस्टला सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. शहा यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्ला चढवला. ते म्हणाले, “ठाकरे सरकारला आरक्षणच द्यायचं नाहीये. त्यामुळे त्यांनी 50 टक्के मर्यादेचं नवं कारण शोधलं आहे. इंदिरा सहानी केसमध्ये अतिशय क्लिअरपणे यावर भाष्य केलं आहे. सध्या मुद्दा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा नाहीये. तर मुद्दा मागास घोषित करण्याचा आहे.”

“एखाद्या समाजाला मागास घोषित केल्यानंतर किती टक्के आरक्षण द्यायचं हा नंतरचा भाग आहे. अजून मागासच घोषित केलं नाही, मग आरक्षणाच्या मर्यादेचा प्रश्न येतो कुठे? असा सवाल करतानाच आतापर्यंत जातींना मागास ठरवण्याचा अधिकार राज्याला नाही म्हणून केंद्राकडे बोट दाखवलं जात होत. आता राज्यांना अधिकार मिळतोय. त्यामुळे सरकारने कारवाई करावी, असं ते म्हणाले. नवनवीन मुद्दे काढून सरकार वेळकाढूपणा करत आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

प्रदेशाध्यक्ष बदलणार नाही

चंद्रकांत पाटील शनिवारपासून (7 ऑगस्टपासून) दिल्लीत होते. त्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला उत्तर देत आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही, असं सांगितलं.

“खरं तर भाजप काय आहे हे तुम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजप समजली पाहिजे, असं सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. अगदी ग्रासरुटच्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत हा बदल होत असतो, असं पाटील म्हणाले. काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपमध्ये तसं नाही. त्यामुळे भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर दिल्लीत दाखल; दिल्ली दरबारी भाजपची काय खलबतं होणार?

मोठी बातमी: दिल्लीत भाजप नेत्यांची खलबतं, देवेंद्र फडणवीस अमित शाहांच्या भेटीला

BJP Meeting : राजधानी दिल्लीत भाजप नेत्यांची खलबतं सुरु, संघटनात्मक बदल की राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड?

व्हिडीओ पाहा :

All Nashik BJP leaders are in Delhi Know what are the reasons

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.