नाशिकः दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात इयत्ता 10 वीच्या (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) आणि 12 वीच्या (उच्च माध्यमिक ) पुरवणी परीक्षा (examinations) घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे लेखी व प्रात्याक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे

नाशिकः दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
प्रातिनिधिक फोटो.
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 12:47 PM

नाशिकः सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात इयत्ता 10 वीच्या (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) आणि 12 वीच्या (उच्च माध्यमिक ) पुरवणी परीक्षा (examinations) घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे लेखी व प्रात्याक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, तशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळाचे (Board of Education) विभागीय सचिव राजेंद्र अहिरे यांनी दिली. (Board of Education announces schedule for 10th and 12th supplementary examinations)

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा 16 सप्टेंबर 2021 ते 11 ऑक्टोबर 2021 या काळात होणार आहे. प्रात्याक्षिक परीक्षा 15 सप्टेंबर 2021 ते 4 ऑक्टोबर 2021 या काळात होणार आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 10 वीची लेखी परीक्षा 22 सप्टेंबर 2021 ते 08 ऑक्टोबर 2021 च्या दरम्यान होणार आहे. प्रात्याक्षिक परीक्षा 21 सप्टेंबर 2021 ते 5 ऑक्टोबर 2021 दरम्यान होणार आहे. या परीक्षा कालावधीत विद्यार्थी, पालक, माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख व परीक्षा संचालनासाठी कार्यान्वित असलेले शासकीय अधिकारी ,कर्मचारी आणि शासकीय कार्यालये यांना परीक्षेचे वेळेपत्रक, प्रवेशपत्र, विषय बदल, ऐनवेळी अपघात झाल्यास त्यासंबंधी कोणती कार्यवाही करावी, आऊट ऑफ टर्न, प्रात्याक्षिक परीक्षा, परीक्षेसंबंधी अन्य माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी हेल्पलाइन सुविधा सुरू करण्यात आली आहे.

तक्रार निवारणासाठी हेल्पलाइन परीक्षा काळात नैसर्गिक व आपत्कालीन प्रसंगी येणाऱ्या अडी-अडचणींची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी हेल्पलाइनचा उपयोग करता येईल. परीक्षा कालावधीत परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडी अडचणींचे निरसन करण्यासाठी सर्व संबंधितांनी 0253-2950410 या हेल्पलाइनवर सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शाळा कधी सुरू होणार? सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यात अजूनही शाळा सुरू नाहीत. शासन नियमानुसार ज्या ठिकाणी एक महिन्यापर्यंत शून्य कोरोना रुग्ण आहेत आणि एकही मृत्यू नाही, असे असेल तरच शाळा सुरू होणार आहेत. मात्र, जिल्ह्यात अजूनही रोज कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. निफाड आणि सिन्नर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर मुलांचे हे वर्षही घरीच बसून जायची शक्यता आहे. (Board of Education announces schedule for 10th and 12th supplementary examinations)

इतर बातम्याः

नाशिकमध्ये विधिमंडळ समितीने काढली स्मार्ट सिटीच्या कारभाराची पिसे

उत्तर महाराष्ट्राला कोरोनाचा दिलासा; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्केंवर

सुखवार्ताः अमेरिकन क्रिकेट प्रीमिअर लीगमध्ये नाशिकच्या नीरजची निवड

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.