दसऱ्याचे सोने लुटण्यासाठी नाशिक सराफा सज्ज; शुद्ध चांदीच्या सुबक मूर्ती फक्त 30 ग्रॅमपासून

नाशिकमधल्या सराफा बाजाराने दसऱ्याची पुरेपुर तयारी केली आहे. नवरात्रोत्सवात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शुद्ध चांदीच्या सुबक मूर्ती सराफात आल्या असून, ग्राहकांची या मूर्तींना मोठी पसंदी आहे.

दसऱ्याचे सोने लुटण्यासाठी नाशिक सराफा सज्ज; शुद्ध चांदीच्या सुबक मूर्ती फक्त 30 ग्रॅमपासून
नाशिकच्या सराफा बाजारामध्ये देवीच्या चांदीच्या मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत.


नाशिकः नाशिकमधल्या सराफा बाजाराने दसऱ्याची पुरेपुर तयारी केली आहे. नवरात्रोत्सवात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शुद्ध चांदीच्या सुबक मूर्ती सराफात आल्या असून, ग्राहकांची या मूर्तींना मोठी पसंदी आहे.

दिवाळीआधी येणाऱ्या दसऱ्याचा सण बाजारात चैतन्य आणतो. या काळात मोठ्या प्रमाणात वाहन बाजार, सराफा, गृह उद्योग, कपडा बाजार आणि इतरही क्षेत्रात मोठी उलाढाल होते. या दसऱ्याचे सोने लुटण्यासाठी सराफा बाजार सज्ज झाला आहे. अनेक सराफांनी नवरात्रोत्सवासाठी खास देवीच्या चांदीच्या मूर्ती आणल्या आहेत. अवघ्या 30 ग्रॅम वजनापासून या मूर्तीची सुरुवात आहे. तर सर्वात मोठी मूर्ती 500 ग्रॅमची आहे, अशी माहिती सराफा व्यावसायिक चेतन राजापूरकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. दसऱ्या दिवशी अनेकजण पिवर सोने खरेदी करायला प्राधान्य देतात. सोन्याच्या नाण्यांचीही मोठी विक्री होते. सध्या बाजारात गेल्या महिनाभरापासून सोन्याच्या दरात मोठी चढ-उतार नाही. हे पाहता येणाऱ्या दसऱ्याला मोठी उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

सोने स्वस्तच
सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46500 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 45400 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 60600 रुपये नोंदवले गेले. गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर चार दिवसांपूर्वी मोठी उलाढाल झाली होती. त्यानंतर आता सराफा व्यापाऱ्यांचे डोळे येणाऱ्या दसरा सणाकडे लागले आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून दसऱ्याकडे पाहिले जाते. अनेकजण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट, नाणे खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. यंदा ऑगस्टपर्यंत नाशिकमध्ये म्हणावा तसा पाऊस नव्हता. मात्र, सप्टेंबरमध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दसऱ्याला जोरदार उलाढाल होण्याचे संकेत आहेत.

नवरात्रोत्सवात दरवर्षी देवीच्या चांदीच्या मूर्तींना मोठी मागणी असते. हे ध्यानात घेऊन आम्ही 30 ग्रॅम वजनापासून ते 500 ग्रॅम वजनापर्यंत देवीच्या मूर्ती आणल्या आहेत. या मूर्ती भाविकांना पसंद पडत आहेत. त्यांच्याकडून चांगली मागणी आहे.
– चेतन राजापूरकर, सराफा व्यावसायिक

इतर बातम्याः

Special Report: गडकरींचा देशीवाद, गाईचे शेण अन् आकाशवाणीची धून!

प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा; उत्तर महाराष्ट्रात 5210 शाळा सुरू, प्रवेशोत्सव सोहळा रंगला!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI