अपघातग्रस्तांना पालक मंत्री भुजबळांनी दिला मदतीचा हात; वणीहून परतताना वाहतूकही केली सुरळीत

वणीच्या सप्तश्रृंगी गडावर जाऊन माथा टेकून परतताना वाटेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. दिंडोरी रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाला होता.

अपघातग्रस्तांना पालक मंत्री भुजबळांनी दिला मदतीचा हात; वणीहून परतताना वाहतूकही केली सुरळीत
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिंडोरी रस्त्यावर अपघातग्रस्तांना मदत केली. यावेळी त्यांनी तुंबलेली वाहतूकही सुरळीत केली.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Oct 07, 2021 | 5:32 PM

नाशिकः वणीच्या सप्तश्रृंगी गडावर जाऊन माथा टेकून परतताना वाटेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. दिंडोरी रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाला होता. त्यामुळे रस्त्यावर दुतर्फा कोंडी झाली होती. भुजबळांनी स्वतः उभे राहून ही वाहतूक सुरळीत केली.

नवरात्रोत्सवाने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आणले आहे. येणाऱ्या काळात बाजार अजून कात टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दसऱ्याच्या तोंडावर सोने-चांदी, कपडे आणि बंपर वाहन खरेदी होण्याची शक्यता आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांसह सारेच आनंदात आहेत. नवरात्रोत्सवाने तो आनंद द्विगुणित केला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी गुरुवारी हजेरी लावली. यावेळी त्यांनी स्वतः सप्तश्रृंगी देवीची पूजा आणि आरती केली. देवीकडे राज्यावरील कोरोनाचे संकट टळू दे, शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्याचे बळ मिळो, असे साकडे त्यांनी देवीला घातले. त्यानंतर गड परिसरातील सुविधा, दुकानांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कळवणचे आमदार नितीन पवार उपस्थित होते.

दरम्यान, वणी येथील दर्शन कार्यक्रम आटोपून भुजबळ परतीच्या प्रवासाला निघाले. तेव्हा दिंडोरी रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाला होता. घटनास्थळी दोन्ही बाजूंनी कित्येक लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हे लक्षात येताच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपला ताफा थांबवला. ते स्वतः गाडीतून खाली उतरले. त्यांनी अपघातस्थळी जात विचारपूस केली. तिथे असलेल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वाहतूक सुरळीत करण्याचा सूचना केल्या. स्वतःही वाहतूक सुरळीत केली. मंत्री महोदयांनीच दखल घेतल्यामुळे थोड्याच वेळात वाहतूक पूर्ववत सुरू झाली. दिंडोरी रस्त्यावर अनेकदा किरकोळ अपघात होतात. त्यामुळे दुतर्फा वाहतूक कोंडी होते. कित्येकवेळ वाहतूक सुरळीत करण्यात जातो. हा मार्ग रूंदीने मोठा केल्यास हा प्रश्न सुटू शकतो.

अपघात वाढले

दरम्यान, गेल्या काही दिवसांत नाशिक जिल्ह्यात अपघात वाढले आहेत. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या अपघातामध्ये दोन तरुणांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. रानवड शिवारात हे दोन वेगवेगळे अपघात झाले असून, दोन्ही घटनेत चारचाकी वाहनाने मोटारसायकल स्वारांना उडवले आहे. या घटनेत मोटारसायकलवरील आकाश सोमनाथ गिते (वय 24, रा. पालखेड) आणि संदीप शिवराम रसाळ (वय 32, रा. आहेरगाव) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकला दिली मागून धडक

चांदवडहून धुळ्याला जाणाऱ्या दुचाकीवरील दोघांचा मालेगाव – धुळे रस्त्यावर मध्यरात्री एक वाजता अपघाती मृत्यू झाला. मालेगाव धुळे रस्त्यावरील हॉटेल ग्रीन प्लाझा समोर काही दिवसांपूर्वी हा अपघात घडला. दुचाकीस्वाराने चालत्या ट्रकला मागून जोराची धडक दिली. त्यात गंभीर मार लागल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

दुचाकीस्वारांचे अपघात सत्र

नाशिकमध्ये दुचाकीस्वारांचे अपघात सत्र थांबताना दिसत नाही. ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना ताब्यात घेऊन त्यांना केंद्रावर नेत त्यांचे समुपदेशन करण्याची मोहीम सुरू केली आहे. या उपदेशाच्या डोसानंतर त्यांना एक प्रमाणपत्रही दिले जात आहे.

इतर बातम्याः

Special report अशी आहे सप्तश्रृंगी देवीची कथाः गिरिजेचे रूप, द्रोणागिरीचा भाग; आठ फूट उंचीची, अठरा भुजांची माता!

नाशिकमध्ये 122 नगरसेवक गॅसवर; कुठला प्रभाग कुठे जोडणार, यावर राजकीय गणित ठरणार!


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें