AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिला, छगन भुजबळ यांचं सर्वात मोठं वक्तव्य; गौप्यस्फोटाने खळबळ

ओबीसी नेते देखील घाबरतात. मात्र आमच्या सोबत 70 टक्के समाज आहे. बजेटमधून आम्हाला आरक्षण मिळाल तर द्या, असं त्याने सांगितलं. त्याचं हे विधान ऐकून मला वाईट वाटले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व सांगितले. मात्र त्यांनी आरक्षण दिलं नाही. मला मराठा नेत्यांची कीव वाटते, हा कसला तुमचा नेता? हा म्हणतोय मंडल आयोग संपून टाकू. मग आरक्षण कशाला मागतो? असा संताप त्यांनी व्यक्त केला.

16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिला, छगन भुजबळ यांचं सर्वात मोठं वक्तव्य; गौप्यस्फोटाने खळबळ
chhagan bhujbalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 03, 2024 | 7:32 PM
Share

कुणाल जायकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नगर | 3 फेब्रुवारी 2024 : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाना साधला आहे. मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही. पण त्यांनी सांगितलं माझी शपथ पूर्ण झाली. तुमची शपथ पूर्ण झालीय. मराठा समाजाला आरक्षण मिळालंय. तर मग सर्व्हेक्षण कशासाठी करत आहात? असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. तसेच मी 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, असा गौप्यस्फोट करून भुजबळ यांनी खळबळ उडवून दिली आहे.

नगरमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांनाच थेट सवाल केला. मला म्हणता भुजबळ राजीनामा द्या म्हणतात. एक आमदार बडबडला भुजबळांना लाथ मारून मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. मला सर्वांना सांगायचं आहे मी राजीनामा दिला. 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि अंबडच्या सभेला गेलो. मी राजीनामा दिला आहे. तुम्ही त्यांना जाऊन सांगा, असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. 17 तारखेला पहिली ओबीसी सभा होती. त्याआधीच राजीनामा दिला होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मग उपोषण कशाला करता?

यावेळी त्यांनी अध्यादेशावरून मनोज जरांगे पाटील यांची खिल्ली उडवली. तुम्ही 27 तारखेला गुलाल उधळला. मग आता उपोषण कशाला करत आहात? अध्यादेश आणि मसुदा यातील फरक याला कळत नाही. मराठा समाज्याला आरक्षण मिळाला पाहिजे. आमचा विरोध नाही, मात्र आमच्या ताटातले घेऊ नका, असं सांगतानाच सर्व्हेक्षण करायला अर्धा तास जातो. अनेक वेळा आकडेवारी वाढवली जाते, खाडाखोड सुरू आहे. आता आरक्षण मिळालंय. गुलाल उधळलाय. मग आता खोटे रेकॉर्ड करायचे काम का सुरू आहे? जामखेड येथे खोटे दाखले दिले जात आहेत. अनेक ठिकाणी खोटे दाखले करायचे काम सुरू आहे, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.

सर्वांना एकत्र राहावं लागेल

सागेसोयरे.. म्हणजे खोटे दाखले द्यायचे काम सुरू आहे. प्रमाणपत्रावर खाडाखोड सुरू आहे, दिशाभूल केली जात आहे. मराठा हे कुणबी झाले तर ओबीसी आरक्षण संपून जाईल. त्यामुळेच सर्वांना एकत्र राहावे लागेल, असं आवाहन त्यांनी केलं.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.