खासगी कंपनीविरोधात रुग्णवाहिका चालक आक्रमक, बेरोजगारीच्या भीतीने नाशिकमध्ये बेमुदत बंदची हाक

हरात सुरु झालेल्या खासगी रुग्णवाहिका कंपनीविरोधात नाशिकमधील सर्व रुग्णवाहिका चालकांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे. शहरातील स्थानिक रुग्णवाहिकांचा नव्याने सुरु झालेल्या खासगी कंपनीमध्ये समावेश करावा अशी मागणी या आंदोलकांनी दिली आहे.

खासगी कंपनीविरोधात रुग्णवाहिका चालक आक्रमक, बेरोजगारीच्या भीतीने नाशिकमध्ये बेमुदत बंदची हाक
AMBULANCE
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 4:25 PM

नाशिक : शहरात रुग्णवाहिका पुरविणाऱ्या एका खासगी कंपनीविरोधात नाशिकमधील सर्व रुग्णवाहिका चालकांनी बेमुदत बंदची हाक दिली. शहरातील स्थानिक रुग्णवाहिकांचा नव्याने सुरु झालेल्या खासगी कंपनीमध्ये समावेश करावा अशी मागणी या आंदोलकांनी केली. जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही, तोपर्यंत हा बंद सुरु राहील अशी भूमिका स्थानिक रुग्णवाहिका चालकांनी घेतली आहे. (Local ambulance drivers in Nashik called strike against ambulance provider private company)

नव्याने सुरु झालेल्या खासगी कंपनीमुळे उपासमार

नाशिकमध्ये नुकतीच एक खासगी कंपनी सुरु झालेली आहे. या कंपनीमार्फत शहरात रुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका पुरविल्या जात आहेत. मात्र, शहरात स्थानिक चालकांकडे स्वत:च्या  रुग्णवाहिका आहेत. पण, आता खासगी कंपनीच्या येण्यामुळे रुग्णवाहिका चालक तसेच वाहक यांच्यावर बेरोजगारी तसे उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक रुग्णवाहिका चालक आक्रमक झाले आहेत. त्यांनी शहरात बेमुदत बंदची हाक दिली आहे.

रुग्णवाहिका सेवा बंद केल्याने रुग्णांचे हाल होण्याची शक्यता

या आंदोलकांनी आमच्याही रुग्णवाहिकांचा समावेश खासगी कंपनीमध्ये करुन घ्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही, तोपर्यंत रुग्णावाहिकेतून रुग्णांची वाहतूक केली जाणार नाही, असा पवित्रा स्थानिक रुग्णवाहिका चालकांनी घेतला आहे.

कोरोना महामारीमध्ये चालकांची बंदची हाक 

दरम्यान, चालकांच्या या भूमिकेमुळे रुग्णांची हेळसांड होण्याची शक्यता आहे. तसेच सध्याच्या कोरोना महामारीमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याची तसेच इतर अडचणी निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

नाशिकच्या व्यावसायिकांमध्ये कोयता गँगची दहशत

दरम्यान, शहरात पुन्हा एकदा गुंडगिरीनं डोकं वर काढलं आहे. शहरात सध्या कोयता गँगची दहशत पाहायला मिळतेय. नाशिक रोडच्या मुक्तीधाम परिसरात काहीजण कोयता आणि तलवारीचा धाक दाखवून दुकानदारांकडून पैसे वरुली करत असल्याचं समोर आलंय. ही घटना काल (6 सप्टेंबर)  घडली. दरम्यान पोलिसांनी या गुंडांवर अद्याप कारवाई झालेली नाही.

इतर बातम्या :

आमदारांनी या रस्त्यावरून जाऊन दाखवल्यास 5 लाख रुपये देणार, खराब रस्त्याविरोधात धुळ्यातील शेतकरी आक्रमक

पुणे सामुहिक बलात्कार प्रकरण; भाजपने आपल्या दिव्याखालील अंधार पाहावा, राष्ट्रवादीचा पलटवार

आता निर्बंध लागले तर संपूर्ण महाराष्ट्रात लागतील; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

(Local ambulance drivers in Nashik called strike against ambulance provider private company)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.