नाशिकमध्ये महायुतीकडून तीन इच्छूक उमेदवार, कोणाला मिळणार तिकीट?

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या आधी येथे रंगत वाढली आहे. कारण महायुतीतील तिन्ही पक्षाकडून तीन उमेदवार येथे इच्छूक आहेत. ऐनवेळी छगन भुजबळ यांची एन्ट्री झाल्याने चुरस आणखी वाढली आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

नाशिकमध्ये महायुतीकडून तीन इच्छूक उमेदवार, कोणाला मिळणार तिकीट?
Nashik loksabha election
Follow us
| Updated on: Apr 05, 2024 | 9:20 PM

नाशिक : नाशिकमध्ये महायुतीत नेमकं कोणाला तिकीट मिळणार याची उत्सुकता असताना छगन भुजबळ यांनी संकेत दिले आहेत.  भुजबळांकडून जिल्हा बँकेच्या कर्जाची परतफेड सुरु झाली आहे. तर शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी देखील प्रचार सुरु केलाय. नाशिकमध्ये उमेदवारी मलाच मिळेल आणि माझ्याशीच लढाई होईल असं शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे सांगत आहेत. पण तिकीट मिळण्याचे संकेत भुजबळांनीच दिले आहेत. भुजबळ कुटुंबीयांकडून नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

भुजबळांकडून कर्ज भरण्यास सुरुवात

28 कोटींपैकी पहिल्या टप्प्यात साडे 6 कोटी भरण्यात आले आहेत. वन टाईम सेटलमेंट योजनेत थकीत कर्ज भरलं जात असल्याचं कळतंय. 2011मध्ये आर्मस्ट्राँग इन्फास्ट्रक्चरसाठी नाशिकच्या जिल्हा बँकेकडून कर्ज घेण्यात आलं होतं. भुजबळांनाच नाशिकमधून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी जिल्हा बँकेच्या थकीत कर्जाची तक्रार होऊ नये म्हणून कर्ज परतफेड सुर झाली आहे.

नाशिकमध्ये स्पर्धा शिंदेच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे, भाजपचे दिनकर पाटील आणि अजित पवार गटाच्या भुजबळांमध्ये आहे. मात्र, भुजबळांना दिनकर पाटलांनी कडाडून विरोध केला आहे. भुजबळ मराठ्यांच्या विरोधात बोलले आहेत. त्यामुळं नाशिकमधून मलाच उमेदवारी मिळेल असं दिनकर पाटलांनी म्हटलंय.

हेमंत गोडसेंकडून प्रचार सुरु

तर इकडे उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी शिंदेंचे खासदार हेमंत गोडसे यांनी प्रचाराला सुरुवात केलीये. गोडसेंनी कार्यालयात मतदार याद्यांची पडताळणी करण्यासह गेल्या 10 वर्षांच्या काळातील विकास कामांचं पत्रकांचं वाटप करणं सुरु झालं आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून 9 जणांची उमेदवारी आतापर्यंत घोषित झाली आहे.

रामटेकमधून विद्यमान खासदार कृपाल तुमानेंना तिकीट नाकारण्यात आलं. हिंगोलीतून हेमंत गोडसेंचा पत्ता कट झालाय. यवतमाळ-वाशिममधून भावना गवळींचा पत्ता कट झाला. 9 जणांच्या यादीत तिघांना तिकीट मिळालेलं नाही. आता नाशिककडे नजरा लागल्या आहेत. अजित पवार गटाच्या भुजबळांना तिकीट मिळालं, तर गोडसेंचाही पत्ता कट होईल. त्यासाठी गोडसेंनी तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे.

 

पाचव्या टप्प्यात मतदान

10 दिवसांआधी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या घराबाहेर कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलनही केलं. त्यावेळी शिंदेंनीही नाशिकचा आग्रह कायम ठेवल्याचा शब्द गोडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही दिला आहे.

नाशिकची निवडणूक 5 व्या टप्प्यात आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नोटिफिकेशन अद्याप निघालेलं नाही. त्यातच गोडसे आणि दिनकर पाटलांच्या स्पर्धेत भुजबळांच्या नावाची अचानक एंट्री झाल्यानं नाशिकचाही फैसला लांबला आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.