AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MSEDCL: महावितरणचा राष्ट्रीय स्तरावर गौरव, ‘इलेक्ट्रिक व्हेईकल’च्या पुढाकाराकरिता ‘इलेट्स इनोव्हेशन’ ॲवार्ड

राज्य शासनाने ई-वाहन धोरणाद्वारे महावितरणची इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. ही जबाबदारी स्वीकारून महावितरणकडून पहिल्या टप्प्यात 50 नवीन चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

MSEDCL: महावितरणचा राष्ट्रीय स्तरावर गौरव, ‘इलेक्ट्रिक व्हेईकल’च्या पुढाकाराकरिता ‘इलेट्स इनोव्हेशन’ ॲवार्ड
केंद्रीय टेक्सटाइल्स मंत्रालयाचे सचिव यू . पी. सिंग यांच्या हस्ते महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी पुरस्कार स्वीकारला.
| Updated on: Apr 24, 2022 | 11:24 AM
Share

नाशिकः महावितरणने (MSEDCL) इलेक्ट्रिक व्हेईकलच्या (Electric Vehicle) अनुषंगाने पुढाकार घेत राज्यात केलेल्या कामाची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. महावितरणला आत्मनिर्भर भारत परिषदेत ‘ट्रान्सपोर्ट अँड मोबिलिटी’ या कॅटेगरीत ‘इलेट्स इनोव्हेशन ॲवार्ड’ (Award) प्रदान करण्यात आला. केंद्रीय टेक्सटाइल्स मंत्रालयाचे सचिव यू. पी. सिंग यांच्या हस्ते महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ई-वाहनांचा वाढता वापर पाहता महावितरणकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी तसेच नवीन चार्जिंग स्टेशन्सला सुलभ प्रक्रियेद्वारे तत्पर वीजजोडणी देण्यासाठी गती देण्यात आली आहे. त्यासाठी एक खिडकी स्वतंत्र वेब पोर्टल सुरू करण्यात आले आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्वात केलेल्या या सर्व कामाची नोंद घेत हा पुरस्कार महावितरणला देण्यात आला आहे.

राज्यात चार्जिंग स्टेशन उभारणार

राज्य शासनाने ई-वाहन धोरणाद्वारे महावितरणची इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. ही जबाबदारी स्वीकारून महावितरणकडून पहिल्या टप्प्यात 50 नवीन चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये पुणे-18, नवी मुंबई-10, ठाणे – 6, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर व अमरावती येथे प्रत्येकी 2 तसेच नागपूर येथील 6 चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे. त्यानुसार महावितरणच्या पहिल्या ईलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्सचे पुणे येथे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले.

ग्राहकांसाठी ‘पॉवर ॲप’

महावितरणने इलेक्ट्रिक वाहन असलेल्या ग्राहकांसाठी ‘पॉवर ॲप’ उपलब्ध करून दिले आहे. या ॲपमध्ये चार्जिंग स्टेशनचे लोकेशन, चार्जिंग चालू बंद करण्याचा पर्याय, चार्जिंग करता आवश्यक चार्जरची उपलब्धता, पेमेंट करता वॉलेट उपलब्ध करून दिले आहे. तसेच ॲपवरून चार्जिंग करता लागणारा वेळ, चार्जिंग करता वापरले जाणारे वीज युनिट व वॉलेटमध्ये उपलब्ध बॅलन्स यांचीही माहिती ग्राहकांना मिळणार आहे. दरम्यान, एकीकडे या पुरस्काराने महावितरणचा मान सन्मान वाढला आहे. मात्र, दुसरीकडे राज्यातील भारनियमानमुळे जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...