VIDEO | ब्रेक फेल झाल्याने ट्रक 100 फूट खोल दरीत, नवीन कसारा घाटात भीषण अपघात

मुंबई-आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटात हा अपघात झाला. पहाटे चार वाजताच्या सुमारास हा ट्रक 100 फूट खोल दरीत कोसळला. 3 जणांना सुखरुप बाहेर काढले, तर एकाचा जागीच मृत्यू झाला.

VIDEO | ब्रेक फेल झाल्याने ट्रक 100 फूट खोल दरीत, नवीन कसारा घाटात भीषण अपघात
इगतपुरीत ट्रक दरीत कोसळून अपघात


शैलेश पुरोहित, टीव्ही 9 मराठी, इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटात भीषण अपघात झाला. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या माल वाहतूक ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्यानंतर ट्रक 100 फूट खोल दरीत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. तिघे जण गंभीर जखमी झाले असून आपत्ती व्यवस्थापन टीमचे त्यांना बाहेर काढले.

नेमकं काय घडलं?

मुंबई-आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटात हा अपघात झाला. पहाटे चार वाजताच्या सुमारास हा ट्रक 100 फूट खोल दरीत कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमने भर पावसात घटनास्थळी धाव घेतली. पहाटे 4 ते 7 वाजेपर्यंत केलेल्या अथक प्रयत्नाने गंभीर जखमी असलेल्या 3 जणांना सुखरुप बाहेर काढले, तर एकाचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, मनोज मोरे, दत्ता वाताडे, अक्षय राठोड, विनोद आयरे, लक्ष्मण वाघ, देवा वाघ, जस्सी, बाळू मांगे यांनी 3 तास अथक प्रयत्न करून तीन गंभीर जखमींना वाचवले. तर प्राण गमावलेल्या मृतदेह कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO: मुंबईच्या जेव्हीएलआर रोडवर भीषण अपघात; भरधाव वेगातील डंपरनं दुचाकीस्वाराला उडवलं

PHOTO : भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, कार चक्काचूर, 3 जणांचा जागीच मृत्यू, पुणे-बंगळुरु महामार्गावर विचित्र अपघात

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI