AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाग्यासाक्या धरण ओव्हरफ्लो, 42 खेडी योजनेतील गावांचा पाणीप्रश्न मिटला

मालेगाव आणि नांदगावमध्ये (Nashik, Malegoan) सतत दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने (Havy Rain) नाग्यासाक्या धरण (Nagyasakya dam)ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या या धरणातून 665 पाण्याचा पांझण नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या भागातील पिण्याचा पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.

नाग्यासाक्या धरण ओव्हरफ्लो, 42 खेडी योजनेतील गावांचा पाणीप्रश्न मिटला
पावसाने धरणे भरली.
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 3:54 PM
Share

नाशिकः मालेगाव आणि नांदगावमध्ये (Nashik, Malegoan) सतत दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) नाग्यासाक्या धरण (Nagyasakya dam)ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या या धरणातून 665 पाण्याचा पांझण नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या भागातील 42 खेडी योजनेतील गावांचा पिण्याचा पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. (Nagyasakya dam overflow, water problem of villages under 42 village scheme solved)

पावसाळा सुरू होऊनही नांदगाव तालुक्यात म्हणावा तसा पाऊस नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. मात्र, गेल्या दोन दिवसांत नांदगाव आणि मनमाडला मुसळधार पावसाने झोडपून काढले. येथे तब्बल 123 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. लेंडी आणि शाकंभरी नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी शहरातील सखल भागातील घरे आणि दुकानांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझडही झाली आहे. दरम्यान, तालुक्यातील सोकोरा येथील पाझर तलाव फुटल्याने अनेक हेक्टरवरील शेतात पाणी साचले आहे. जोरदार पावसामुळे नांदगाव तालुक्याचा पाणीप्रश्न मिटला आहे. नाग्यासाक्या धरण तुडूंब भरले आहे. 395 दलघफू क्षमतेच्या या धरणात खूप कमी पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांमध्ये चिंता होती. आता या धरणातून 665 क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. गेल्या वर्षीही हे धरण भरले होते.

जिल्ह्यातील पाणीसाठ्यात वाढ

सध्या जिल्ह्यातील 24 प्रकल्पांत 68 टक्के, गंगापूर समूहात 85 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात 628 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टी झालेल्या नांदगाव व मनमाड तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली आहे. सर्वाधिक 123 मिमी पाऊस एकट्या नांदगाव तालुक्यात नोंदवला असून, जिल्ह्यात आतापर्यंत 76.67 टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे चणकापूर धरण 95 टक्के भरले आहे. तर पुनद धरण 92 टक्के भरले. सध्या चणकापूरमधून 800 क्यूसेकने, तर पुनदमधून नदीसाठी 1300 क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गिरणा व पुनद नदीला यंदा पहिल्यांदाच पूर आला आहे.

कडवा ओव्हरफ्लो

इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथील कडवा धरण मंगळवारी दुपारी ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे सिन्नरकरांची पाणी चिंता मिटली आहे. सिन्नरसाठीची पाणीपुरवठा योजन या धरणातून आहे. मंगळवारी दुपारी कडवा नदीत 150 क्यूसेक विसर्ग सुरू होता. 1924 दलघफू क्षमतेच्या कडवा धरणावर 88 किमी लांबीचा कालवा असून त्यामुळे इगतपुरी, नाशिक, सिन्नर, निफाड तालुक्यातील एकूण 19404 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. (Nagyasakya dam overflow, water problem of villages under 42 village scheme solved)

इतर बातम्याः 

नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीने 54 हजार 877 हेक्टरवरील पीक मातीमोल, 7 हजार कोंबड्यांचा मृत्यू

बाजेच्या पायाला ट्यूब बांधून पुरातून काढला मार्ग, पण उपचाराविना मुलीने सोडले प्राण!

नाशिकमध्ये विभागीय आयुक्तांच्या बनावट सहीचा वापर करत घातला २१ लाखांचा गंडा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.