अजितदादांच्या R R आबांबाबतच्या विधानावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले, ते राहिलेले नाहीत….
Chhagan Bhujbal on Ajit Pawar Statement About R R Patil : अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांच्याबाबत केलेलं विधान सध्या चर्चेत आहे. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर...
काल सांगलीच्या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याबाबत एक विधान केलं. आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांची उघड चौकशी व्हावी. या फाईलवर त्यांनी सही केली, असा आरोप अजित पवारांनी केला. त्यानंतर त्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला बोलायचे नाही, ते राहिलेले नाही. अजित पवार बोलले त्याच्या आधी 2 वर्षापूर्वी शरद पवारांच्या कानावर टाकले होते, असं भुजबळ म्हणालेत.
महायुतीतील विसंवादावर भाष्य
महायुतीमध्ये विसंवाद असल्याच्या चर्चांवरही छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. काँगेस होता तेव्हा शिवसेना उदयाला आली. 95 ला काँगेस विरुद्ध शिवसेना बीजेपी झाली. काँग्रेसचे दोन पक्ष झाले. आता आपण पाहतोय शिवसेना 2 आणि आमचे 2 झाले. काँग्रेस वेगळी झाली, आता 6 झाले. वंचित आघाडी आहेतच. मला तिकीट मिळेल म्हणून काम करत असतात. अपेक्षा भंग झाला तर इकडून तिकडे जातात. सगळीकडे झाले आहे. उमेदवार वाढत आहेत. अपक्ष वाढले आहेत, असं छगन भुजबळ म्हणालेत.
सुहास कांदेंवर गुन्हा झालाय. यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिलीय. कुणी मारामारी आणि शिवीगाळ केली तर गुन्हा दाखल होणारच. मी टीव्हीला शिवीगाळ पहिली. टिम्ब टिम्ब लावून दाखवत आहेत. पुरावे आहेत तर गुन्हा दाखल झाला आहे. दिवाळी आहे माझ्या जनतेला शुभेच्छा. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुकीचा उत्सव साजरा करा. विरोधक म्हणून पाहा शत्रू म्हणून पाहू नका, असं छगन भुजबळ म्हणालेत.
समीर भुजबळांच्या उमेदवारीवर काय म्हणाले?
समीर भुजबळला उभे राहायच्या आगोदर सर्व पदांचा राजीनामा द्यावा लागेल, सांगितले होते. त्याने राजीनामा दिला आणि अपक्ष फॉर्म भरलाय. खोसकर यांच्या कार्यक्रमाला अजित पवार आले तेव्हा तक्रार केली होती. खोसकर आणि आम्ही तक्रार केली, आपलेच लोक उभे राहणार असे सांगितले होते. तेव्हा समीर भुजबळ यांचा निर्णय झालेला नव्हता. अजित पवारांच्या कानावर टाकले होते. नाशिकमध्येच झाले असे नाही अनेक ठिकाणी झाले. भाजप आणि शिवसेना असे झाले. वर्तमान पत्र वाचले तेव्हा कळले नाही कोण कुठं आहे. आम्हाला सुद्धा घड्याळ निशाणी घेता आली असती. आम्ही इथिक्स पाळले. राजीनामा दिला नसता तर काढून टाकले असते. बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न चालू राहील, असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.