AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंजली दमानियांच्या दाव्यानंतर छगन भुजबळ लाईव्ह; भाजपमध्ये जाण्याच्या दाव्यावर पहिली प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal on Anjali Damania claim : अंजली दमानिया यांच्या एका ट्विटने चर्चांना उधाण आलं आहे. मंत्री छगन भुजबळ हे भाजपमध्ये जाणार का? असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलं. त्यांच्या दाव्यानंतर छगन भुजबळ लाईव्ह... भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया त्यांनी दिली. वाचा सविस्तर...

अंजली दमानियांच्या दाव्यानंतर छगन भुजबळ लाईव्ह; भाजपमध्ये जाण्याच्या दाव्यावर पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Feb 02, 2024 | 10:46 AM
Share

चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नाशिक | 02 जानेवारी 2024 : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत का? असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला. अंजली दमानिया यांनी हे ट्विट करताच राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली की, छगन भुजबबळ खरंच भाजपच्या वाटेवर आहेत का? दमानिया यांच्या ट्विटला आता खुद्द मंत्री छगन भुजबळ यांनीच उत्तर दिलं आहे. त्यांच्या या ट्विटला आता खुद्द मंत्री छगन भुजबळ यांनीच उत्तर दिलं आहे. भाजपकडून कसलीही ऑफर आलेली नाही, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.

भुजबळांचं स्पष्टीकरण

मला अजून भाजपच्या ऑफरबद्दल काही माहिती नाही. दमानियांना कशी काय माहिती मिळाली? हे मला माहीत नाही. मला कुठल्या पदाचा हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसी समाजासाठी काम करत आहे. नवीन काही आता मला पाहिजे, असं काही नाही. असं काही प्रपोजल मला आलेलं नाही. माझ्या पक्षात मी मंत्री आहे. माझी काही घुसमट होत नाहीये, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

अंजली दमानिया यांचं ट्विट काय?

भुजबळ भाजपच्या वाटेवर? एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप?, असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलं. त्यांच्या या ट्विटनंतर चर्चांना उधाण आलं. आता भुजबळ यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दमानिया काय म्हणाल्या?

गेल्या काही दिवस पूर्वी मला एकाने सांगितले की भुजबळांना भाजप हे ओबीसी फेस बनवणार आहेत. फक्त राज्यात नाही देशभरात ओबीसी म्हणून फेस करणार आहेत. मनोज जरांगे हे एक साधे शेतकरी होते पण ते जर एवढा मोठा लढा देऊ शकतात तर भुजबळ सारखा फेस भाजप ला त्यांच्या गरज का पडली? भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत का?, असं टीव्ही 9 मराठीशी बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटलं.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.