AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ही’ लोकसभेची जागा प्रकाश आंबेडकर यांनीच लढावी; ‘इंडिया’च्या जागा वाटपाबाबत संजय राऊत यांचं अत्यंत महत्वाचं विधान

Sanjay Raut on India Alliance Jagavatap and Devendra Fadnavis Statement : 'गळ्याती पट्ट्या'वरून राजकारण तापलं... देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला संजय राऊत यांचं जोरदार प्रत्युत्तर. 'इंडिया'आघाडीच्या जागा वाटपाबाबत संजय राऊत यांचं अत्यंत महत्वाचं विधान, वाचा...

'ही' लोकसभेची जागा प्रकाश आंबेडकर यांनीच लढावी; 'इंडिया'च्या जागा वाटपाबाबत संजय राऊत यांचं अत्यंत महत्वाचं विधान
| Updated on: Jan 08, 2024 | 11:31 AM
Share

चैतन्य गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नाशिक | 08 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचं विधान केलं आहे. इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत त्यांनी भाष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली आहे. आंबेडकरी विचारांची जनता कोणत्याही परिस्थितीत संविधानाची नासधूस करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना मत देणार नाही. प्रकाश आंबेडकर यांचा देखील हाच विचार आहे. लवकरच याबाबत निर्णय होईल. महाविकास आघाडीत एक मत नक्की आहे. अकोला ही जागा परंपरेनुसार प्रकाशजी लढतात, त्यांनीच ती जागा लढावी, असं संजय राऊत म्हणालेत.

“…म्हणून दिल्लीत चर्चा”

मुंबईच्या चर्चा मुंबईत होतात. पण काँग्रेसचे हायकमांड दिल्लीत आहेत. त्यांना एकेक जागेसाठी दिल्लीत जावं लागतं. त्यांची सोय आम्ही पाहत आहोत. शिंदे गटाचे, अजित पवार गटाचे हायकमांड दिल्लीत आहे. त्यांना अमित शाह, जे पी नड्डा यांना भेटावे लागतं. आम्हाला मुंबईत बसायचं आहे, ही काँग्रेसची सोय आहे. आमची सोय नाही. म्हणून दिल्लीत जाऊन चर्चा करू, असं संजय राऊतांनी म्हटलं.

फडणवीसांना प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा होता. आताच्या मुख्यमंत्र्यांच्या मानेला तो पट्टा नाहीये, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मानेचा पट्टा हा एक आजार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीच्या पट्टा आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

आमदार अपात्रता प्रकरणावर राऊत म्हणाले…

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. न्यायव्यवस्था किती गंभीर अवस्थेला पोहचली आहे? राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले आणि अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना जाऊन भेटले.न्यायमूर्ती ज्यांना न्याय करायचा आहे, ते आरोपीला जाऊन भेटले. म्हणून आम्ही म्हणतो संविधान धोक्यात आहे… जाऊन भेटणं, चहापाणी करणं आणि हसत हसत बाहेर येणं, ही या देशाची सध्याची अवस्था आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...