AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik railway accident | अपघातानंतर 21 तासांत रुळ दुरुस्ती फत्ते; चौकशीसाठी उद्या येणार अधिकारी

नाशिक येथील रेल्वे अपघात कसा झाला, याची चौकशी करण्यासाठी रेल्वे अधिकारी उद्या नाशिकमध्ये येणार असल्याचे समजते. मुंबई सेंट्रल सर्कलचे आयुक्त मनोज अरोरा बुधवारी सकाळी दहा वाजता नाशिकला येतील. ज्या नागरिकांना या अपघाताची माहिती आहे, त्यांनी आयुक्तांची भेट घ्यावी. त्यांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik railway accident | अपघातानंतर 21 तासांत रुळ दुरुस्ती फत्ते; चौकशीसाठी उद्या येणार अधिकारी
नाशिक येथील देवळाली ते लहवी स्थानकादरम्यान रुळ दुरुस्तीनंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.
| Updated on: Apr 05, 2022 | 10:40 AM
Share

नाशिकः नाशिक (Nashik) जवळच्या देवळाली ते लहवी स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघातानंतर अवघ्या 21 तासांमध्ये रुळ दुरुस्तीची कामगिरी फत्ते करण्यात आली आहे. या मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनिल जयनगर पवन एक्स्प्रेस (Pawan Express)चे चार डबे रुळावरुन घसरल्याची दुर्घटना रविवारी घडली. त्यात एका प्रवाशाचा मृत्यू (Death) झाला असून पाच प्रवासी जखमी (Injured) झाले आहेत. रेल्वेतील एलएचबी या जर्मन तंत्रज्ञानामुळे रेल्वे रुळावरून घसरली तरी डबे एकमेकांवर आदळत नाहीत. ते विलग होतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होते. अधिकचे नुकसान टळते. त्याचाच प्रत्यय नाशिक येथील अपघातात आला. मात्र, हा अपघात कसा झाला याची चौकशी करण्यासाठी रेल्वे अधिकारी उद्या नाशिकमध्ये येणार असल्याचे समजते. मुंबई सेंट्रल सर्कलचे आयुक्त मनोज अरोरा बुधवारी सकाळी दहा वाजता नाशिकला येतील. ज्या नागरिकांना या अपघाताची माहिती आहे, त्यांनी आयुक्तांची भेट घ्यावी. त्यांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

500 कामगार झटले

रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम 500 कामगारांनी केले. मुंबई, इगतपुरी, कल्याण, नाशिक, भुसावळ येथून या कामगारांना बोलावण्यात आले होते. त्यांच्या दिमतीला 8 क्रेन, 5 पोकलॅण्ड, टॉवर वॅगन, गॅस कटिंग मशीन, वेल्डिंग मशीन असे साहित्य होते. अपघातात 12 डबे रुळावरून घसरण्यात आले होते. त्यातले दोन डबे चांगले आहेत. तर उर्वरित डब्यांचे नुकसान झाले आहे. चांगले असेलेल डबे नाशिकरोड स्थानकावर रवाना करण्यात आले आहेत.

300 मीटर रेल्वेमार्ग

अपघातानंतर सर्व प्रवाशांना नाशिकरोड स्थानकावर पाठवण्यात आले. त्यानंतर रविवारी सायंकाळी सहा वाजता रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. त्याला मिशन 23 असे नाव देण्यात आले. ते 21 तासांत पूर्ण करण्यात आले. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी न थांबता अहोरात्र कष्ट उपसले. अपघाताच्या ठिकाणी 300 मीटर नवा रेल्वे मार्ग टाकण्यात आला. आता या मार्गावरून वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. उद्या हा अपघात कसा झाला, याची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, अपघातानंतर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्या आता पूर्ववत धावणार आहेत.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.