AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करुन नाशिकला ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण करणार : छगन भुजबळ

ऑक्सिजन निर्मीतीमध्ये जिल्हा स्वयंपूर्ण होण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत पाच ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून उर्वरित ऑक्सिजन प्रकल्प वेळेत पूर्ण केले जातील, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करुन नाशिकला ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण करणार : छगन भुजबळ
| Edited By: | Updated on: Sep 12, 2021 | 6:41 PM
Share

नाशिक : जिल्ह्यातील पहिल्या व दुसऱ्या कोरोना लाटेचा अभ्यास करता ऑक्सिजन हा सर्वात महत्त्वपूर्ण घटक असल्याचे निदर्शनास आहे. त्यामुळे ऑक्सिजन निर्मीतीमध्ये जिल्हा स्वयंपूर्ण होण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत पाच ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून उर्वरित ऑक्सिजन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. (Nashik will be self-sufficient in oxygen production by completing all projects on time: Chhagan Bhujbal)

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स, ऑक्सिजन सिलेंडर, बेड्स तसेच बालरुग्णांसाठी टास्क फोर्स तयार करून पूर्व तयाारी करण्यात आली आहे. गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी ज्यांना घरी राहून उपचार घेणे शक्य असून तेथे आवश्यक सर्व व्यवस्था आहे, अशा रुग्णांना घरीच उपचार देण्यासाठी नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे ज्या रुग्णांची घरी व्यवस्था होणार नाही अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरीत करण्यासाठी उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आठवड्याभरात 10 प्रकल्प कार्यान्वित होणार

जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, जिल्ह्यात लसीकरणाचे काम वेगाने सुरू असून आतापर्यंत एकूण 29 लाख 69 हजार 011 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये 22 लाख 5 हजार 146 नागरिकांनी पहिला डोस घेतला असून 7 लाख 63 हजार 865 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्याचप्रमाणे एकूण 24 ऑक्सिजन प्रकल्पांपैकी 5 ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत येत्या आठवड्यात 10 प्रकल्पांचे काम पूर्ण होणार आहेत.

अतिवृष्टीबाधित नांदगावातील पंचनामे पूर्ण करावेत

नांदगांव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील नागरिकांना द्यावयाच्या सहाय्यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ तसेच नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी व अन्य अधिकाऱ्यांनी चर्चा केली. शासन मापदंडाप्रमाणे पंचनामे तातडीने पूर्ण करून जिल्हा नियोजन समितीकडील काही अंशी निधी तातडीच्या कामांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री भुजबळ यांनी दिले. त्याचप्रमाणे तेथील पूर परिस्थितीमुळे रोगराई व साथीचे आजार पसरणार नाहीत यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

इतर बातम्या

उत्तर प्रदेशात 403 ऐवजी 100 जागा लढवणार, 24 तासात शिवसेना बॅकफूटवर; महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशच्या सेना नेत्यांमध्ये संभ्रम?

गोवा, उत्तर प्रदेशात मविआचा प्रयोग; गोव्यात 20 तर उत्तर प्रदेशात 100 जागा लढवणार; संजय राऊत यांची घोषणा

VIDEO: शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं; बाळासाहेब थोरातांचं पहिल्यांदाच खुलं आवतन

(Nashik will be self-sufficient in oxygen production by completing all projects on time: Chhagan Bhujbal)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.