AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अजित पवार भावी मुख्यमंत्री’, माणिकराव कोकाटे म्हणतात, ‘मला ऊर्जा मंत्रिपद’

"आता मविआच्या सभा होणार आहेत. येत्या 2 एप्रिलला संभाजीनगरमध्ये सभा आहे. मविआचे सर्व नेते तिथे येणार आहेत आणि दाखवून देणार मविआ एकत्र आहे. गावपातळीवरही वाद टाळा", असा सल्ला अजित पवारांनी दिला.

'अजित पवार भावी मुख्यमंत्री', माणिकराव कोकाटे म्हणतात, 'मला ऊर्जा मंत्रिपद'
| Edited By: | Updated on: Mar 30, 2023 | 9:51 PM
Share

नाशिक : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात शहा गावी शेतकरी मेळाव्याच्या ठिकाणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डींग लावण्यात आले. या शेतकरी मेळाव्याला स्वतः अजित पवार उपस्थितीत होते. अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्र्याचे होर्डींग पाहून सिन्नरचे आमदार माणिकराव कोकटे यांनी एक वर्षासाठी ऊर्जा किंवा वित्त मंत्री करा, अशी मागणीच या शेतकरी मेळाव्या प्रसंगी अजित पवार यांच्याकडे केली. मग या पाठोपाठ मलाही जलसंपदा मंत्री करून टाका, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली

यावेळी अजित पवार भाषण करण्यासाठी उभे राहिले. ते बोलतांना म्हणाले, अरे आपले सरकार नाही. मग तुम्हाला मंत्री कसे करू? मी तर तुम्हाला खासदार करण्याच्या विचारात होतो. या मेळ्यात त्यांनी एकप्रकारे नाशिक लोकसभा मतदारसंघात माणिकराव कोकाटे यांना उभे करण्याचे संकेत माजी खासदार समीर भुजबळ व्यासपीठावर असताना दिले. तर नगर लोकसभा मतदारसंघांसाठी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांना संकेत दिले.

“बारामतीत नाही अशा सुंदर इमारती सिन्नरमध्ये आहेत. दुधाचे दर वाढले, मका, विविध पिके घेतली जातात. आमदार आषुतोष काळे आणि माणिकराव कोकाटे म्हणतात मंत्री करा. सरकार तर येऊ ‌द्या. मी तर माणिकरावांना खासदार करणार होतो. मविआच्या जागावाटपाचा विषय आहे, गंमतीचा भाग सोडा”, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांची भाजपवर टीका

“या सरकारला नपुंसक , शक्तीहीन सरकार का म्हटलं जातय. जाती-धर्मात तेढ निर्माण करून कोणाचंही भलं झालं नाही. जिथे दंगली उसळतात तिथे उद्योगधंदे जात नाहीत. उद्योजक विचार करतात. आम्ही मविआ सरकार काळात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी खबरदारी घेत होतो”, असं अजित पवार म्हणाले.

“पदवीधरमध्ये नाकारलं, कसब्यात भाजपचा पराभव झाला. चिंचवडची जागा थोडक्यात गेली. तिथे दोघेही तिकीट मागत होते. आता मविआच्या सभा होणार आहेत. येत्या 2 एप्रिलला संभाजीनगरमध्ये सभा आहे. मविआचे सर्व नेते तिथे येणार आहेत आणि दाखवून देणार मविआ एकत्र आहे. गावपातळीवरही वाद टाळा. जूनपर्यंत सहा ते सात ठिकाणी सभा घेणार आहोत. जी लोकं फुटलीत तिथे जनता खुश नाही”, असा दावा अजित पवारांनी केला.

“तरूण का घोषणा देतायत? कारण त्यांना वाईट वाटत आहे. आताच्या मंत्र्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजतात की नाही हेच समजत नाही. गेल्या 10 महिन्यांत एकही घटक समाधानी नाही. आज 82 व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतायत”, असं अजित पवार म्हणाले.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.