कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी पूर्वतयारी सुरुच ठेवावी; पालकमंत्री भुजबळांच्या सूचना

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 14, 2021 | 7:34 PM

नाशिकमधील कोरोना बाधितांची संख्या स्थिर आहे. परंतू अद्याप एक हजारापेक्षा कमी झालेली नाही, तसेच निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी पूर्वतयारी सुरुच ठेवावी; पालकमंत्री भुजबळांच्या सूचना

Follow us on

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या स्थिर आहे. परंतू अद्याप एक हजारापेक्षा कमी होत नसल्याने त्याचप्रमाणे निर्बंध शिथिल करून उद्योग व्यवसायांची वेळ वाढवून देण्यात आली असल्याने नागरिकांनी सतर्कता ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या कोरोना सद्यस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. (Preparations for third wave of corona should continue : Chhagan Bhujbal)

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, लसीकरणासाठी ज्या प्रमाणात लसी उपलब्ध होत आहेत, त्यानुसार लसीकरणाचे काम सुरू आहे. आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी यांना सरसकट कमी न करता आवश्यकतेनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत निर्णय घेण्यात यावा. लग्न समारंभामध्ये होणारी गर्दी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असून अशा समारंभात मास्कचा वापर अनिवार्य करणे गरजेचे असून यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच जिल्ह्यात तयार करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. विद्युत विभागाने सर्व ऑक्सिजन निर्मीती प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देवून तेथील सर्व संबंधित कामे पूर्ण करावीत.

जिल्ह्यातील तीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्याची कोरोना सद्यस्थिती सादर करताना सांगितले की, जिल्ह्यातील 24 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांपैकी 3 प्रकल्प सुरू झाले आहेत. तसेच उर्वरित प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर असून 31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण 28.08 टक्के झाले असून लसी उपलब्धतेनुसार लसीकरणाचे काम सुरू आहे, असे जिल्हाधिकरी मांढरे यांनी बैठकीत सांगितले.

प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित

यावेळी महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, म्युकर मायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र चौधरी आदी बैठकीस उपस्थित होते.

इतर बातम्या

नाशिक शिक्षणाधिकारी लाच प्रकरण, वैशाली झनकर यांचा जामीन अर्ज फेटाळला, आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी

24 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या नाशिकच्या ऑक्सिजन गळतीचा ठपका ठेकेदार कंपनीवर, जवळपास 25 लाखाचा दंड

SitabaiChi Misal | नाशिकच्या ‘मिसळवाल्या आजी’ गेल्या! प्रसिद्ध मिसळ व्यावसायिक सीताबाई मोरे यांचे निधन

(Preparations for third wave of corona should continue : Chhagan Bhujbal)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI