Corona : मुंबईत कोरोनाचे 29 नवे रुग्ण, कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, आजपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण

Corona : मुंबईत कोरोनाचे 29 नवे रुग्ण, कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, आजपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण
कोरोना सांकेतिक फोटो आणि मुंबई महापालिका
Image Credit source: tv9

मुंबईत दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून दिवसभरात फक्त 29 रुग्ण आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. यात वेगळी बाब म्हणजे एकाही मृत्यू सापला नसल्याने मुंबईतील कोरोना अटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्ये मागच्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Mar 21, 2022 | 9:07 AM

मुंबई : मुंबईत (Mumbai) दिवसागणिक कोरोना (Corona) रुग्णांची संख्या कमी होत असून दिवसभरात फक्त 29 रुग्ण आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. यात वेगळी बाब म्हणजे एकाही मृत्यू सापला नसल्याने मुंबईतील कोरोना अटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्ये मागच्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असून मुंबई पालिकेनं आज 8 हजार 708 कोरोना रुग्णांच्या चाचण्या केल्या आहेत. राज्यात (State) मुंबईमध्ये आता कोरोना अटोक्यात येत असल्याचं दिसत असून मुंबईकरांना एकप्रकारे दिलासाच मिळाला आहे. नव्याने आढळलेल्या 29 पैकी 27 जणांना कोरोनाचे कोणतेही लक्षण नाही आहेत. तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आकडेवारीनुसार एकही रुग्ण ऑक्सिजन बेडवर नाही. राज्यातील कोरोना आकडेवारी पाहिल्यास राज्यात 113 रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

धारावी पुन्हा चर्चेत

सगळ्यांना कोरोनाचा धारावी पॅटर्न तर माहितच आहे. यात आता धारावीमधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दादर, माहीम आणि धारावीत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. धारावीचा कोरोनामुक्ती पॅटर्नही सर्वात माहीत आहे. धारावीत सक्रीय रुग्णांची संख्या एक आकडी झाली आहे. धारावीमध्ये 1, माहीममध्ये 2, दादरमध्ये 2 सक्रिया कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे आता मुंबईतील कोरोना कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत आजपासून मुलांचे लसीकरण

मुंबईत आजपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण 300 केंद्रावर करण्यात येणार आहे. यापूर्वी मुंबईतील फक्त 12 केंद्रावर प्रायोगिक तत्वावर लसीकरणाला परवानगी देण्यात आली होती. मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात 16 मार्चपासून लसीकरण लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आजपासून 300 लसीकरण केंद्रावर 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. महापालिकेकडे कर्बेव्हॅक्स लसीचे एक लाख 20 हजार डोस असून ते सर्व डोस वितरित केले जाणर आहे.

मुंबईकरांना दिलासा

मुंबईत कोरोनाच्या नव्याने आढळलेल्या 29 पैकी 27 जणांना कोरोनाचे कोणतेही लक्षण नाही आहेत. तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आकडेवारीनुसार एकही रुग्ण ऑक्सिजन बेडवर नाही. मुंबईत दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून दिवसभरात फक्त 29 रुग्ण आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. यात वेगळी बाब म्हणजे एकाही मृत्यू सापला नसल्याने मुंबईतील कोरोना अटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्ये मागच्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असून मुंबई पालिकेनं आज 8 हजार 708 कोरोना रुग्णांच्या चाचण्या केल्या आहेत.

इतर बातम्या

कपड्यांवरून Ananya Pandayला ट्रोल करणाऱ्यांना चंकी पांडेचं सडेतोड उत्तर; “समाजात कसं वावरावं याचं भान..”

Mumbai Indians IPL 2022: पलटनच्या नव्या टीमची ताकत काय? कमजोरी कुठली? मॅच विनर्स कोण? जाणून घ्या सर्व डिटेल्स

Chhatrapati Shivaji Maharaj | रयतेच्या राजाला मानचा मुजरा देण्यासाठी अमित ठाकरे किल्ले शिवनेरीवर, शिवभक्तांची मांदियाळी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें