Navi Mumbai Crime : नवी मुंबईत कार चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात गुन्हे शाखेला यश, आरोपींकडून 9 गाड्या हस्तगत
नवी मुंबईत कार चोरीचे प्रमाण वाढलं आहे. त्याअनुषंगाने या कार चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेचे एक पथक तैनात ठेवण्यात आलं होतं. त्यानुसार सीसीटीव्ही व इतर माहितीनुसार पोलिसांनी कार चोरांचा माग घातला. कार चोरी करणारी ही टोळी कार चोरी करून तामिळनाडू इथे जाऊन कार विकत असे.

नवी मुंबई : नवी मुंबईत कार चोरी (Car Theft) करणाऱ्या टोळीला जेरबंद (Arrest) करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून 9 गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या गाड्यांची एकूण किंमत 54 लाख रुपये आहे. पोलिसांनी एकूण तीन चोरट्यांना पकडले असून या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग आहे का याचा पोलिस तपास करीत आहेत. अटक केलेल्या चोरट्यांकडून आतापर्यंत 12 गुन्ह्यांची उकल झाली आहे. यापैकी 4 गुन्हे नवी मुंबईतील आहेत तर 6 गुन्हे मुंबईतील आहेत. पोलिस आरोपींची सखोल चौकशी करत आहेत. चौकशीतून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. (Crime Branch succeeds in nabbing car theft gang in Navi Mumbai 9 vehicle seized)
आरोपींकडून 54 लाख रुपयांच्या गाड्या जप्त
नवी मुंबईत कार चोरीचे प्रमाण वाढलं आहे. त्याअनुषंगाने या कार चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेचे एक पथक तैनात ठेवण्यात आलं होतं. त्यानुसार सीसीटीव्ही व इतर माहितीनुसार पोलिसांनी कार चोरांचा माग घातला. कार चोरी करणारी ही टोळी कार चोरी करून तामिळनाडू इथे जाऊन कार विकत असे. पोलिसांनी याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तामिळनाडूत जाऊन या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींकडून 9 मारुती सुझुकी इको कार हस्तगत केल्या आहेत. एका कारची किंमत 6 लाख असून अशा 9 कार जप्त करण्यात आल्या आहेत. याची एकूण किंमत 54 लाख रुपये आहे. आतापर्यत 12 गुन्हे उघडकीस आणले आहेत. यापैकी 4 नवी मुंबईचे तर 6 मुंबईचे आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी सांगितले. (Crime Branch succeeds in nabbing car theft gang in Navi Mumbai 9 vehicle seized)
इतर बातम्या
Raghunath Kuchik : चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती खोटी, पीडितेचे पुन्हा गंभीर आरोप
