रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची माळ महेंद्र घरत यांच्या गळ्यात; कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाला पदग्रहण सोहळा

हर्षल भदाणे पाटील

| Edited By: |

Updated on: Sep 06, 2021 | 8:45 PM

शिक्षक दिनाचे औचित्य साधत महेंद्र घरत यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते अलिबाग येथे बोलत होते.

रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची माळ महेंद्र घरत यांच्या गळ्यात; कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाला पदग्रहण सोहळा
रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची माळ महेंद्र घरत यांच्या गळ्यात

पनवेल : रायगड जिल्हा हा माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची कर्मभूमी आहे. या भूमीत काँग्रेसची पाळेमुळे खोलवर रुजली असल्याने जिल्हा काँग्रेसला परत पुनर्जिवित करणे फारसे अवघड काम नाही. सर्वधर्म समभाव जपणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकत्यांनी एकदिलाने काम केल्यास जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा निर्माण करण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष महेंद्र घरत यांनी व्यक्त केला. (Mahendra Gharat elected as Raigad Congress District President)

शिक्षक दिनाचे औचित्य साधत महेंद्र घरत यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते अलिबाग येथे बोलत होते. काँग्रेस पक्षात पूर्वी फितुरीचे प्रमाण अधिक होते. त्याचा फायदा काँग्रेसला न होता तो अन्य पक्षांना व्हायचा; परंतु आता पदाची सूत्रे हाती घेतल्याने यापुढे असे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रवीण ठाकूर यांची भाजपवर टीका

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रवीण ठाकूर यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने चांगल्या दिवसांची आशा नागरिकांना दाखवली. त्यांच्याच वाटेला आज वाईट दिवस आलेत, असे ठाकूर म्हणाले. तसेच काँग्रेस पक्ष हा फार जुना पक्ष असून, हाच पक्ष गोरगरिबांच्या अडीअडचणी सोडवू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतील पदाधिकारी प्रवीण ठाकूर, कॅप्टन कलावत, नंदा म्हात्रे, स्नेहल जगताप, डॉ. मोहित शेठ यांच्यासह कोविड योद्धा म्हणून माजी मुजफ्फर चौधरी, ग्रामसेवक कृष्णा तालुक लांगी यांचाही जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर घरत यांची निवड

महाडचे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव जगताप यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी माणिकराव जगताप यांनी अखेरचा श्वास घेतला. विद्यार्थी काँग्रेसमधून जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये अनेक पदे भूषवली. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांच्या जाण्याने रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाची जागा रिक्त होती. (Mahendra Gharat elected as Raigad Congress District President)

इतर बातम्या

डोक्यात दगड टाकून तरुणाची हत्या, पुण्याच्या चाकणमध्ये एकच खळबळ, हत्येमागे नेमकं कारण काय?

शेतकरी थकतील असे वाटत असेल तर ती केंद्राची चूक; नवाब मलिक यांनी सुनावले

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI