AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तू माझ्याशी बोलत का नाही’ म्हणत चाकूने वार! नवी मुंबईत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला

Navi Mumbai Girl attacked : ल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर नवी मुंबईतील नेरुळच्या डी. व्हाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रबाळे पोलिस या हल्ल्याप्रकरणी आता ताब्यात घेण्यात आलेल्या हल्लेखोर तरुणाची अधिक चौकशी करत आहेत.

'तू माझ्याशी बोलत का नाही' म्हणत चाकूने वार! नवी मुंबईत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला
नवी मुंबईतील खळबळजनक घटनाImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 04, 2022 | 8:54 PM
Share

नवी मुंबई : ‘तू माझ्याशी बोलत का नाही’ म्हणत एकानं तरुणीवर हल्ला (Girl attacked in Navi Mumbai) केला आहे. या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली. या हल्ल्यामुळे मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीला (girl injured in attacked) तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या तरुणीवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान, या प्रकरणी अखेर पोलिसांतही (Navi Mumbai) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयानं या गुन्ह्याप्रकरणी पोलीस कोठडी सुनावली आहे. नवी मुंबईमध्ये घडलेल्या या प्रकारानं एकच खळबळ उडाली. कॉलेजवरुन ही तरुणी घरी जात होती. त्यावेळी तरुणानं एकतर्फी प्रेमातून या तरुणीवर चाकून हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकी कुठे घडली घटना?

नवी मुंबईच्या रबाळे महामार्गावर एक तरुणी कॉलेजवरुन घरी परतत होती. त्यावेळी या मुलीच्या घराजवळ राहणाऱ्या एका मुलानं या मुलीला अडवलं. या मुलीला अडवून हल्लेखोर तरुणानं तू माझ्याशी बोलत का नाहीस?, असा जाब विचारला. एकतर्फी प्रेमातून या तरुणीवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुलीनं काय सांगितलं?

या हल्ल्याप्रकरणी मुलीचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या जबाबावरुन हल्लेखोर तरुणालाही ताब्यात घेतलं आहे. या हल्लाप्रकरणी पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर हजरही केलं. न्यायालयानं संशयित आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर नवी मुंबईतील नेरुळच्या डी. व्हाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रबाळे पोलिस या हल्ल्याप्रकरणी आता ताब्यात घेण्यात आलेल्या हल्लेखोर तरुणाची अधिक चौकशी करत आहेत. क्राईम ब्रांचचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 1 तारखेला ही घटना घडली होती. 22 वर्षीय आरोपीला पोलिसांनी पीडित तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.

संबंधित बातम्या :

शाळेत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, संतप्त पालकांकडून शाळेवर दगडफेक

कल्याण रेल्वे स्थानकात महिलेला मोबाईल हिसकावून पळणारे चोरटे गजाआड

गोरखनाथ मंदिरात पीएसी जवानांवर हल्ला, हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पाहा व्हिडीओ :

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.