AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईत 107 कोटींहून अधिक रक्कमेची मालमत्ताकर थकबाकी, पालिकेकडून थेट मालमत्ता जप्तीच्या नोटीसा

या मालमत्ता धारकांची 107 कोटींहून अधिक रक्कमेची मालमत्ताकर थकबाकी आहे. विशेष म्हणजे यात अनेक नामवंत बिल्डरांचा समावेश आहे.

नवी मुंबईत 107 कोटींहून अधिक रक्कमेची मालमत्ताकर थकबाकी, पालिकेकडून थेट मालमत्ता जप्तीच्या नोटीसा
नवी मुंबई महापालिका
| Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 1:30 PM
Share

नवी मुंबई : मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने अभय योजना जाहीर केली होती. मात्र यानंतरही काही थकबाकीदारांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही. त्यांना वठणीवर आणण्यासाठी नवी मुंबई पालिकेने अॅक्शन प्लॅन तयार  केला आहे. यानुसार मोठ्या रक्कमेची थकबाकी असणाऱ्या आणखी 49 थकबाकीदारांवर जप्ती / लिलावाची नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात आली आहे. जर त्यांनी ही पूर्ण रक्कम येत्या 21 दिवसात भरली नाही, तर त्यांच्यावर थेट कारवाई केली जाणार आहे, असा इशारा महापालिकेने दिला आहे. (Navi Mumbai property have property tax arrears of over Rs 107 crore municipal issued notice direct property confiscation)

नवी मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीत बेलापूर 7, नेरुळ 10, वाशी 2, तुर्भे 24, कोपरखैरणे 4 आणि घणसोली विभागातील 2 मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्ता धारकांची 107 कोटींहून अधिक रक्कमेची मालमत्ताकर थकबाकी आहे. विशेष म्हणजे यात अनेक नामवंत बिल्डरांचा समावेश आहे.

मालमत्ता जप्ती / लिलावाची नोटीस

मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. कोरोनाच्या कालावधीत नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने मालमत्ता कर थकबाकीदारांकरिता अभय योजना लागू केली होती. तसेच त्यास मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र या 2 महिन्याहून अधिक सवलतीच्या कालावधीतही अभय योजनेस प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मोठ्या रक्कमेची थकबाकी असणाऱ्या 31 मार्च 2021 पूर्वीच्या 26 मालमत्ता कर थकबाकीदारांना 1 ते 15 जून या कालावधीत मालमत्ता जप्ती / लिलावाची नोटीस बजाविण्यात आली होती.

107 कोटीहून अधिक रक्कमेची मालमत्ताकर थकबाकी

अशाचप्रकारे मोठ्या रक्कमेची थकबाकी असणाऱ्या आणखी 49 थकबाकीदारांवर जप्ती / लिलावाची नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. यात बेलापूर विभागातील 7 मालमत्ता, नेरुळ विभागातील 10 मालमत्ता, वाशी विभागातील 2 मालमत्ता, तुर्भे विभागातील 24 मालमत्ता, कोपरखैरणे विभागातील 4 मालमत्ता आणि घणसोली विभागातील 2 मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्ता धारकांची 107 कोटीहून अधिक रक्कमेची मालमत्ताकर थकबाकी आहे. अशाप्रकारे आत्तापर्यंत 75 मालमत्ताकर थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटीसा बजाविण्यात आलेल्या आहेत.

थकबाकी भरण्यासाठी 21 दिवसांची मुदत

या थकबाकीदारांना थकबाकी भरण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तरीही रक्कम न भरल्यास मालमत्ता अटकावणी करून जप्ती / लिलावपर्यंतची धडक कारवाई करण्यात येणार आहे. अशाप्रकारे थकबाकीदारांच्या थकीत रक्कमेची विभागनिहाय माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यामार्फत याबाबतचा नियमित आढावा घेतला जात आहे. त्यानुसार थकबाकीदारांना रितसर नोटीसा बजाविण्यात येत आहेत.

मालमत्ताकर भरणे हे प्रत्येक मालमत्ताकर धारकाचे कर्तव्य आहे. याव्दारे जमा होणाऱ्या महसूलातून नागरी सुविधांची पूर्तता करण्यात येते. त्यामुळे मालमत्ताकर थकबाकीदारांनी कायदेशीर कारवाईची कटू वेळ येऊ न देता आपली मालमत्ताकराची थकबाकी तसेच नियमित मालमत्ताकर त्वरीत भरणा करावा, असे आवाहन अभिजीत बांगर यांनी केले आहे.

(Navi Mumbai property have property tax arrears of over Rs 107 crore municipal issued notice direct property confiscation)

संबंधित बातम्या : 

रायगडमधील JNPT बंदरात DRI ची मोठी कारवाई, 879 कोटी रुपयांचं 293 किलो हेरॉईन जप्त

पाकिस्तानचा स्वस्त कांदा बाजारपेठेत, बांगलादेशच्या सीमा बंद, भारतीय कांदा उत्पादक अडचणीत

“सर्वांसाठी घरे” या सिडकोच्या ध्येयाची वचनपूर्ती, सिडकोच्या घरांचा ताबा देण्यास सुरुवात

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.