साकीनाक्यातील घटनेच्या निषेधार्थ नवी मुंबईत आरपीआयचा कँडल मार्च, पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी

हर्षल भदाणे पाटील

| Edited By: |

Updated on: Sep 13, 2021 | 10:40 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घृणास्पद घटनेचे अत्यंत निंदनीय वर्णन केले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (महाराष्ट्राचे गृहमंत्री) यांच्याशी बोलून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले.

साकीनाक्यातील घटनेच्या निषेधार्थ नवी मुंबईत आरपीआयचा कँडल मार्च, पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी
साकीनाका बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ नवी मुंबईत आरपीआयचा कँडल मार्च
Follow us

नवी मुंबई : साकीनाका बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता कँडल मार्च काढण्यात आला. मुंबईतील साकीनाका येथील घटना जी सैतानाला देखील लाजवेल अशी ही घटना घडली आहे. अजून किती निर्भया आपण पाहणार आहोत. अशा नराधमांना फाशीच झाली पाहिजे तसेच राक्षसी प्रवृत्तीचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. साकीनाका बलात्कार आरोपींना जलद शिक्षा मिळावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. (RPI’s candlelight march in Navi Mumbai to protest Sakinaka rape case, demand justice for victim’s family)

खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घृणास्पद घटनेचे अत्यंत निंदनीय वर्णन केले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (महाराष्ट्राचे गृहमंत्री) यांच्याशी बोलून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले. या मुद्यावर, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की ते पोलिसांकडून प्रत्येक मिनिटाची माहिती घेत आहेत आणि कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

आरोपी विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

“पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने शासनाचा एससी एसटी अ‍ॅक्ट या गुन्ह्याला लावलेला आहे. त्याअनुषंगाने तपास सुरु आहे. आपण आरोपीला अटक केली असून 21 तारखेपर्यंत कस्टडीत आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने सर्व घटनेची माहिती दिली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

वकील राजा ठाकरे यांची नेमणूक

“घटनास्थळावर पीडित महिला कधी आली, आरोपी कधी आला, गुन्हा कसा घडला, त्यानंतर आरोपी कसा पळून गेला, या सगळ्याची पुराव्यासकट माहिती मिळाली आहे. आरोपीकडे असणारं प्रमुख हत्यारंही आपण जप्त केलं आहे. या संवेदनशील गुन्ह्यासाठी स्पेशल वकील राजा ठाकरे यांची नेमणूक केली आहे. ते आपल्याला तपासात मार्गदर्शन करत आहेत”, असं नगराळे यांनी सांगितलं.

नेमकं काय घडलं?

“गणेशोत्साव सारख्या महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या धार्मिक सणामध्ये काल एक अत्यंत दुर्देवी आणि घृणास्पद घटना घडली आहे. अतिशय निंदणीय प्रकार घडला आहे. 9 आणि 10 सप्टेंबरच्या रात्री साधारण 3 वाजून 20 मिनिटांच्या दरम्यान साकीनाक्याच्या खैराणी रोड येथे पुठ्ठ्याची कंपनी आहे. त्या कंपनीचा वॉटमनने कंट्रोल रुमला फोन करुन कळवलं की, तिथे एका बाईला मारहाण सुरु आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पाठवलं”, असं हेमंत नगराळे यांनी सांगितलं. (RPI’s candlelight march in Navi Mumbai to protest Sakinaka rape case, demand justice for victim’s family)

इतर बातम्या

आसूडगावातील गणेश भक्तांनी साकारला नवी मुंबई विमानतळाचा देखावा, भूमिपुत्र गणेशभक्त दी बा पाटील यांच्या नावावर ठाम

Ganesh Chaturthi 2021 : गणेश चतुर्थीला अवश्य करुन पहा या 5 फ्युजन पाककृती

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI