रामदेव बाबा म्हणाले भारत-पाक मॅच देशहितविरोधी, आता मलिक यांचे जशास तसे उत्तर, खोचक ट्विटची चर्चा

योगगुरु रामदेव बाबा यांनी सध्याच्या स्थितीत भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना होणे भारताच्या हिताच्या विरुद्ध आहे, असे वक्तव्य केल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी रामदेवबाबा यांच्यावर चांगलीच टीका केली आहेत.

रामदेव बाबा म्हणाले भारत-पाक मॅच देशहितविरोधी, आता मलिक यांचे जशास तसे उत्तर, खोचक ट्विटची चर्चा
RAMDEV BABA NAWAB MALIK

मुंबई : योगगुरु रामदेव बाबा यांनी सध्याच्या स्थितीत भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना हा देशहितविरोधी आहे, असे वक्तव्य केल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी रामदेवबाबा यांच्यावर खोटक टीका केली आहेत. त्यांनी बाबा थांबा म्हणत मोदी है तो मुमकीन है असं उपहासात्मक ट्वीट केलंय. एका ट्विटमध्ये त्यांनी मोदी आणि रामदेव बाबा अशा दोघांवर प्रहार केला आहे.

सामना भारताच्या राष्ट्रधर्माच्या विपरित आहे

योगगुरु रामदेव बाबा आज नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी 24 ऑक्टोबर रोजी होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ‘टी-20’ सामना भारतीय राष्ट्रधर्माच्या विपरित आहे, असं मत व्यक्त केलं. त्यानंतर आता मलिक यांनी बाबाजी रुकीये ना मोदी है तो मुमकीन है अशी उपहासात्मक टीका केली आहे. देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान असतील तर काहीही होऊ शकतं असं त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.

रामदेवबाबा काय म्हणाले ?

रामदेव बाबा यांनी 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान टी-20 सामन्यावर प्रतिक्रिया दिली. सध्याच्या स्थितीत भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना होणे भारत देशाच्या हिताविरुद्ध आहे. एकीकडे आतंकी खेळ आणि दुसरीकडे क्रिकेटचा खेळ सुरु आहे. या दोन्ही गोष्टी सोबत चालू शकत नाहीत, असे रामदेव बाबा म्हणाले.

बॅालिवूडमध्ये नशा करण्याचं विनाशकारी तंत्र सुरु

तसेच पुढे बोलताना त्यांनी बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावरदेखील प्रतिक्रिया दिली. “बॅालिवूडमध्ये नशा करण्याचं विनाशकारी तंत्र सुरु आहे. हे भावी पिढीसाठी धोकादायक आहे. सर्व इंडस्ट्रीने मिळून आपला कचरा साफ करायला हवा. ड्रग्ज त्यांच्यासाठीच आत्मघातकी आणि धोकादायक असेल,” असे रामदेव बाबा म्हणाले.

पेट्रोलचे दर कमी होण्याचं स्वप्न कधी ना कधी पूर्ण होणार

तसेच यावेळी बोलताना त्यांनी इंधन दरवाढीवरदेखील प्रतिक्रिया दिली. पेट्रोलचे दर कमी होण्याचं स्वप्न कधी ना कधी पूर्ण होणार आहे, असे रामदेव बाबा म्हणाले. पेट्रोल डिझेल दरवाढीवर बोलताना वरील एक वाक्य म्हणत त्यांनी भविष्यात इंधनाचे भाव कमी होतील असा आशावाद व्यक्त केला.

इतर बातम्या :

जीम मालकाचा माज, फर्निचर बनवणाऱ्या मजुरांना उपाशीपोटी 24 तास डांबलं, अत्याचाराला वैतागलेल्या कंत्राटदाराचा जीममध्ये गळफास

फक्त राज ठाकरेच नाही तर आई आणि बहिणीलाही कोरोना, नेमकं काय म्हणाले डॉ. जलील परकार?

दीड वर्षात प्रदर्शनं बंद, छायाचित्रकार ठाकरेंचा ‘फोकस’ चित्रकार, शिल्पकारांकडे का वळला नाही ? आशिष शेलार यांचा सवाल

(nawab malik criticized ramdev baba for commenting on india vs pakistan t20 match)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI