मुंबई उच्च न्यायालयाचा मंदाकिनी खडसे यांना दिलासा, तूर्तास अटक न करण्याचे आदेश

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकीनी खडसे यांना अखेर दिलासा मिळाला आहे. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला असून त्यांना तूर्तास अटक न करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाचा मंदाकिनी खडसे यांना दिलासा, तूर्तास अटक न करण्याचे आदेश
EKNATH KHADSE MANDAKINI KHADSE


मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकीनी खडसे यांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना तूर्तास अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी सत्र न्यायालयाने मंदाकीनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

मंदाकिनी खडसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यांना अधीही अटक केलं जाण्याची शक्यता होती. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर न्यायालयात आज सुनावणी घेण्यात आली. यामध्ये मंदाकिनी खडसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. तसेच या कालावधीत त्यांनी ईडीला तपासकार्यात सहकार्य करावे असे निर्देश कोर्टाने दिले.

कोर्टाच्या निकालात काय आहे ?

मुंबई उच्च न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांना अंतरिम दिलासा दिला आहे. ईडीच्या कारवाईनंतर त्यांची लगेच जामिनावर सुटका होईल. तसेच 17 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत मंदाकिनी खडसे यांना प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे. येत्या 21 ऑक्टोबरला मंदाकिनी खडसे  यांनी विशेष न्यायालयासमोर हजर राहण्याचेदेखील आदेश देण्यात आले आहेत.

यापूर्वी सत्र न्यायालयाने फेटाळला होता अटकपूर्व जामीन

याआधी पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला होता. मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं.

इतर बातम्या :

आमदारांना दिवाळीआधीच ठाकरे सरकारकडून गिफ्ट, विकासनिधीत घसघशीत वाढ

जावयाकडे गांजा सापडलाच नाही, गांजा  आणि तंबाखूमधील एनसीबीला फरक कळतो की नाही?; नवाब मलिक यांचा सवाल

तुम्ही कोणते टगे पोसत आहात ते पाहा; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघाती हल्ला

(NCP leader Eknath Khadses wife Mandakini Khadse granted interim relief from Bombay High Court in Pune land deal case being investigated by the Enforcement Directorate)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI