अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी अहमदनगरमध्ये दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केलंय. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे तब्बल 1 हजार 100 खाटांचं हे कोविड सेंटर सुरु झालं आहे. येथे 100 ऑक्सिजन बेड्स आहेत. विशेष म्हणजे या कोरोना उपचार केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. लंके यांनी आवाहन केल्यानंतर 17 लाख रोख रक्कम आणि 5 टन धान्य जमा झाले आहे. भाजीपाला, फळे, अंडी, किराणा, वाफ घेण्याची यंत्रे, कोमट पाण्यासाठी थर्मास अशा विविध वस्तूंचं वाटप रुग्णांना करण्यात येतंय. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. निलेश लंके यांनी सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय (NCP MLA Nilesh Lanke started 1100 beds covid care center in Ahmednagar).