सुधारणांवरुन वाद नको, पण व्यवस्था कमकुवत होऊ नये, कृषी कायद्यांवर शरद पवारांच्या ट्विटने ट्विस्ट

कॉर्पोरेट कंपन्या हा सर्व माल शेतकऱ्यांकडून कमी भावात खरेदी करतील. त्यानंतर दीर्घकाळ त्याची साठवणूक करुन ठेवतील. | Sharad Pawar

सुधारणांवरुन वाद नको, पण व्यवस्था कमकुवत होऊ नये, कृषी कायद्यांवर शरद पवारांच्या ट्विटने ट्विस्ट
एखाद्या बागायती पिकाची किंमत 100 टक्क्यांनी वाढली किंवा नाशिवंत मालाची किंमत 50 टक्क्याहून अधिक वाढली तर सरकारला त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळेल. ही बाब चिंतेची असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारला काही सल्ले देऊ केले आहेत. शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही मते मांडली आहेत. (Sharad Pawar new twit serries on Farm laws)

यामध्ये शरद पवार यांनी कृषी कायद्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्ही बाजूंवर प्रकाश टाकला. धान्य, डाळी, कांदा, बटाटा आणि तेलबिया यावरील साठवणुकीची मर्यादा उठवल्यास काळाबाजार होण्याची शक्यता आहे. कॉर्पोरेट कंपन्या हा सर्व माल शेतकऱ्यांकडून कमी भावात खरेदी करतील. त्यानंतर दीर्घकाळ त्याची साठवणूक करुन ठेवतील. त्यामुळे या मालाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्यातील सुधारणेविषयीही मला चिंता वाटत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. या सुधारणेनुसार एखाद्या बागायती पिकाची किंमत 100 टक्क्यांनी वाढली किंवा नाशिवंत मालाची किंमत 50 टक्क्याहून अधिक वाढली तर सरकारला त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळेल. ही बाब चिंतेची असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

‘बाजार समित्यांमधील सकारात्मक सुधारणांना विरोध नाही’

सुधारणा ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असते. त्यामुळे कोणीही बाजार समिती किंवा मंडईमधील सुधारणांना विरोध करणार नाही. यासंदर्भातील सकारात्मक चर्चा होणे म्हणजे संबंधित यंत्रणा दुबळी किंवा उद्ध्वस्त होईल, असा अर्थ काढू नये, असेही शरद पवार यांनी अधोरेखित केले.

संबंधित बातम्या:

विरोधक म्हणाले, आंदोलक शेतकऱ्यांवरचे गुन्हे परत घ्या, मोदी म्हणाले…

‘राहुल गांधींची देश तोडण्याची भाषा, पोलिसांप्रती सहानुभूतीचा एक शब्दही नाही’, स्मृती इराणी भडकल्या

मोठी बातमी: संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या तयारीत

(Sharad Pawar new twit serries on Farm laws)

Published On - 7:32 pm, Sat, 30 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI