Rupali Thombare Patil : तुम्ही मुंबई ठप्प करणार असाल तर..रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?
Rupali Thombare Patil : "नाशिक मधल्या टीसीएस कंपनी प्रकरणात ज्या पद्धतीने गुन्हे दाखल केले, त्याच पद्धतीने अशोक खरात प्रकरणात ही गुन्हे दाखल झाले पाहिजेत"

“दिवंगत नेते अजित पवार यांचा अपघात नसून घात आहे, असं अनेकांना वाटतं. या संदर्भात सातत्याने प्रश्नही विचारले जातात. सुनेत्रा पवार यांनी योग्य आणि पारदर्शक तपास व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे निवेदन दिले आहे. संपूर्ण बारामतीला प्रश्न आहे दादांचा अपघात होऊ शकत नाही हा घातपात आहे. महाराष्ट्राच्या मनात जी शंका आहेत तीच शंका सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली” असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.
“आता राजकारणाची परिस्थिती वाईट आहे. आपल्या आंदोलनामुळे लोकांची अडचण होईल. जर तुम्ही मुंबई ठप्प करणार असाल तर सहाजिकच आहे नागरिक वैतागतील. सत्ताधारी असो किंवा विरोधक यांनी लक्षात घेतलं पाहिजे. हम करेसो कायदा असं आता नाही. 2029 ला सत्तेत कोण येईल हे मतदार ठरवतील” असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितलं.
..तर जनता गप्प बसणार नाही
“तुम्ही जर जनतेला मूर्ख बनवणारे कार्यक्रम ठरवणार असला, तर जनता गप्प बसणार नाही. गिरीश महाजन स्वतः त्या ठिकाणी होते. ट्राफिक होणार नाही, याची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती” असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या. “खरात प्रकरणांमध्ये जे कोणीही त्यांना सहकार्य करणारे असतील, त्यांच्यावर ती कारवाई झाली पाहिजे. नाशिक मधल्या टीसीएस कंपनी प्रकरणात ज्या पद्धतीने गुन्हे दाखल केले, त्याच पद्धतीने अशोक खरात प्रकरणात ही गुन्हे दाखल झाले पाहिजेत” अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली.
भोंदूबाबाला वाचवण्यासाठी पदाचा गैरवापर
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली ठोंबरे पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “चाकणकर यांना या प्रकरणात सह सूत्रधार करून गुन्हा नोंदवावा. भोंदूबाबाला वाचवण्यासाठी त्यांनी पदाचा गैरवापर केला आहे. खरातच्या प्रत्येक कृत्यात चाकणकर यांचा सहभाग दिसतो. SIT कडं हे सगळं आलं आहे. चाकणकर यांना मुख्य सूत्रधार करून तातडीने त्यांना अटक करण्यात यावी” अशी मागणी रूपाली ठोंबरे पाटील यांनी केली होती.
