त्यापेक्षा मोदींनी 15 लाख…; देशात नवे जीएसटी दर लागू होताच संजय राऊत कडाडले
भारतात GST च्या नवीन दरांची घोषणा झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर तीव्र टीका केली आहे. राऊत यांनी या नवीन दरांना 'मूर्ख बनवण्याचे धंदे' असे संबोधले आहे.

आजपासून देशभरात जीएसटीचे नवे दर लागू झाले आहेत. केंद्र सरकारनं जीएसटी संदर्भात मोठा निर्णय जाहीर केला. पूर्वी जीएसटीचे चार स्लॅब होते. त्यातील दोन रद्द करून आता फक्त 18 टक्के आणि 5 टक्के असे दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत. हे सुधारीत दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अनेक वस्तू स्वस्त होतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. आता यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हे सर्व करण्यापेक्षा मोदींनी आमचे १५ लाख दिले असते तर ते जास्त सोयीचे पडले असते. हे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत. त्यांनी ५ वाजता जीएसटीची घोषणा केली, असे संजय राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींच्या वेळेबद्दलही शंका उपस्थित केली.
जीएसटीची घोषणा
एरव्ही मोदी ८ वाजता बोलतात. त्यांचा ८ ही देशाला धक्का देण्याची वेळ आहे. मग काल ५ वाजता का बोलले? काल ते ५ वाजता यासाठी बोललेत. कारण देशाने भारत पाकिस्तान सामना पाहावा. ते किती महान राष्ट्रभक्त आहेत. ८ वाजता अंधभक्तांना क्रिकेट सामना पाहता यावा. त्यामुळे त्यांनी ५ वाजता जीएसटीची घोषणा केली, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
काल त्यांनी काही सवलती दिल्या. ज्यामुळे काही सण आणि उत्सव आहेत. त्यात स्वस्त होणार असे सांगितलं. पण हा खोटारडेपणा आहे. साधारण २ लाख कोटींची ही सवलत मोदींनी दिले. यात १४० कोटी भारतीयांना वर्षाला १२१३ रुपयांचा फायदा होणार आहे. यानुसार महिन्याला ११० ते १२० रुपयांचा इतकाच लाभ मिळणार आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
आमचे १५ लाख दिले असते तर सोयीचे पडलं असतं
आम्ही सर्व तपासून पाहिलं. आम्हालाही अर्थशास्त्र कळतं. हे सर्व करण्यापेक्षा मोदींनी आमचे १५ लाख दिले असते तर ते जास्त सोयीचे पडले असते. हे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत. त्यांनी ५ वाजता जीएसटीची घोषणा केली. त्यांना ८ वाजता क्रिकेटच्या मॅच पाहायची होती. काल जय शाहादेखील मुंबईत होते, अशी माहिती आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.
