जरांगे शब्द जपून वापरा….राणे कोणालाही…निलेश राणेंचा थेट इशारा; वातावरण तापणार?
मनोज जरांगे हे आझाद मैदानात आमरण उपोषणाला बासले आहेत. भाजपाचे नेते नितेश राणे यांच्याकडून जरांगे यांना लक्ष्य केलं जातंय. तर जरांगे हेदेखील नितेश राणे यांच्यावर सडकून टीका करताना दिसत आहेत. आता या वादात निलेश राणे यांनी उडी घेतलीआहे.

Nilesh Rane On Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांचे मुंबईत आमरण उपोषण चालू आहे. त्यांच्या उपोषणाला काही नेत्यांनी पाठिंबा दिला आहे, तर काही नेते मात्र त्यांच्यावर सडकून टीका करताना दिसत आहेत. भाजपाचे आमदार तथा मंत्री नितेश राणे यांनी तर मनोज जरांगे यांच्यावर थेट टीका केली आहे. परिणामी जरांगे यांनीदेखील नितेश राणे यांचा चिचुंद्री म्हणत उद्धार केला आहे. आता नितेश राणे आणि जरांगे यांच्या वादात राणे कुटुंबातीलच निलेस राणे यांनी थेट उडी घेतली असून जरांगे यांना इशारा दिला आहे.राणे कोणालाही घाबरत नाहीत, असं म्हणत त्यांनी जरांगे यांना डिवचलं आहे.
नितेश काही टोकाचं बोलला नाही
नितेश राणे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मनोज जरांगे यांचा समाचार घेतला आहे. त्यांनी निलेश राणे यांना थेट पाठिंबाच दिला आहे. नितेश राणे एखाद्या विषयावर बोल्यानंतर त्यावर तुम्ही टीका करा पण वैयक्तिक टीका नको. नितेश काही टोकाचं बोलला नाही, किंवा वैयक्तिक बोलला नाही. कुठल्याही धमकीला राणे परिवार कधीच घाबरत नाही. तुम्ही जसे मरायला तयार असता तसेच आम्ही राणे पण मरायला तयार असतो, असा थेट इशाराच निलेश राणे यांनी जरांगे यांना दिलाय.
भाषा जपून वापरली पाहिजे कारण…
तसेच, आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोणी हात टाकायच्या गप्पा करत असेल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही. भाषा जपून वापरली पाहिजे कारण आम्ही तुम्ही काही परके नाहीत, असा सल्लाही निलेश राणे यांनी जरांगे यांना दिला. मनोज जरांगे पाटील तुमचे आणि माझे संबंध नेहमी आपुलकीचे, कौटुंबिक राहिले आहेत. हे संबंध असेच राहिले पाहिजे. मी आजपर्यंत नातं जपलं, पुढे ही जपेन. आपल्याकडूनही तीच अपेक्षा आहे, अशी अपेक्षा निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते?
नितेश राणे हे मनोज जरांगे यांच्यावर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर त्याला नितेश राणे यांनी आक्षेप घेतला होता. तेच खासदार सुप्रिया सुळे यांनी जरांगे यांची आझाद मैदानावर भेट घेतल्यानंतर मी हिंदुत्वाचं काम करतो. जिहाद मानसिकतेचे लोक जरांगे यांच्या व्यासपीठावर कसे बसतात? असा सवाल नितेश राणे यांनी केला होता. त्यामुळेच जरांगेदेखील नितेश राणे यांच्यावर सडकून टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे आता जरांगे-राणे वादाचे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
