AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक चव्हाणांचा पक्ष संपवून काँग्रेसकडून आदर्श प्रकरणाचा बदला : नितेश राणे

कोल्हापूर : पक्षविरोधी काम केल्याच्या कारणावरुन काँग्रेस काही आमदारांवर कारवाई करण्याची शक्यता आहे. याच संदर्भात बोलताना काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी कोल्हापुरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. चव्हाण यांना आदर्श प्रकरणावरुन काढलं होतं. त्यामुळे ते महाराष्ट्रात काँग्रेस संपवून बदला घेत असतील, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर चांगलं काम करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची […]

अशोक चव्हाणांचा पक्ष संपवून काँग्रेसकडून आदर्श प्रकरणाचा बदला : नितेश राणे
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM
Share

कोल्हापूर : पक्षविरोधी काम केल्याच्या कारणावरुन काँग्रेस काही आमदारांवर कारवाई करण्याची शक्यता आहे. याच संदर्भात बोलताना काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी कोल्हापुरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. चव्हाण यांना आदर्श प्रकरणावरुन काढलं होतं. त्यामुळे ते महाराष्ट्रात काँग्रेस संपवून बदला घेत असतील, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर चांगलं काम करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची वेळ काँग्रेसवर आली असेल तर त्यांनी आत्मचिंतन करावं, असं देखील नितेश राणे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पाच आमदारांचा समावेश आहे. आमदार अब्दुल सत्तार, आमदार जयकुमार गोरे, आमदार नितेश राणे, आमदार कालिदास कोळंबकर यांच्यावर 10 मे रोजी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

राधाकृष्ण विखे पाटील

मुलाला अहमदनगरमधून उमेदवारी न दिल्याने विखे पाटील नाराज होते. ही जागा आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे, पण राष्ट्रवादीने सुजय विखे यांच्यासाठी जागा सोडली नाही. त्यानंतर विखे पाटील पक्षापासून दुरावले आणि ते शिर्डी मतदारसंघात शिवसेनेच्या व्यासपीठावरही दिसले होते.

नितेश राणे

सध्या काँग्रेसचेच आमदार असलेले नितेश राणे यांनी त्यांचे बंधू निलेश राणे यांच्यासाठी काम केलं. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसचाही उमेदवार होता. पण नितेश राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्यासाठी काम केलं.

आमदार अब्दुल सत्तार

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसविरोधात जाहीरपणे भूमिका घेतली आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाही दिला. औरंगाबादमध्ये काँग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे सत्तार नाराज होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसविरोधातच प्रचार केला. दरम्यान, अब्दुल सत्तार यांची आपण पक्षातून हकालपट्टी करत असल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर केलं होतं.

आमदार जयकुमार गोरे

काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका करत माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मदत करणार असल्याचा निर्धार केला होता. जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माणचे आमदार आहेत.  “ज्या पक्षाने मला आमदारकीचे सुख लाभू दिले नाही, आमदार झाल्यानंतर तीनच दिवसानंतर माझ्यावर हत्त्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल करुन एकापाठोपाठ एक खोटे गुन्हे दाखल केले, वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मला अडचणीत आणले. यामुळे यापुढील काळात माढाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माझा पाठिंबा असेल,” असं ते म्हणाले होते.

आमदार कालिदास कोळंबकर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील, त्या पक्षात जाईन, अशी घोषणा काँग्रेसचे बंडखोर आमदार कालिदास कोळंबकर यांनी केली होती. तसेच, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचार करणार असल्याचंही आमदार कालिदास कोळंबकर यांनी म्हटलं होतं. कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. सलग सातवेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून कोळंबकर यांची ओळख आहे. नारायण राणेंसोबत त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राणेंसोबत आलेले सर्व आमदार शिवसेनेत परतले, मात्र केवळ कालिदास कोळंबकर हे काँग्रेसमध्येच राहिले. आता कालिदास कोळंबकर काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत.

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.