Nashik Election Results 2026 LIVE: नाशिकच्या प्रभाग क्रमांक 21 व 22 मध्ये शिवसेनेचे वर्चस्व, वाचा सविस्तर
Nashik Municipal Corporation NMC Ward 21 and 22 Election Results 2026 LIVE Updates in Marathi : नाशिकमधील प्रभाग क्रमांक 21 आणि 22 वर शिवसेनेचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणूकीत या दोन्ही प्रभागातील 8 पैकी 6 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता.

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 21 आणि 22 वर सर्वांची नजर आहे. आज आपण हे प्रभाग कोणत्या परिसरात आहेत? येथील समस्या काय आहेत? कोणत्या पक्षाचा प्रभाव आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तसेच या प्रभागात मागील निवडणुकीत कोणी विजय मिळवला होता हे जाणून घेऊयात.
प्रभाग क्रमांक 21
या प्रभागात प्रामुख्याने विहितगाव, देवळाली गाव, मालधक्का रोड, रेल्वे स्टेशनचा काही भाग आणि नाशिक रोडचा दक्षिण-पूर्व भाग समाविष्ट होतो. हा भाग जुना नाशिक रोड आणि नवीन विकसित होत असलेल्या वसाहतींचे मिश्रण आहे. 2011 च्या जनगणनेनुसार आणि नवीन पुनर्रचनेनुसार या प्रभागाची अंदाजे लोकसंख्या 39000 ते 43000 च्या दरम्यान आहे. यात ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. विहितगाव आणि जुन्या देवळाली गाव परिसरात पावसाळ्यात पाणी साचण्याच्या आणि सांडपाण्याच्या निचऱ्याच्या मोठ्या समस्या आहेत. रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यांमुळे येथे नेहमी वाहतूक कोंडी होते. काही नवीन वसाहतींमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. या प्रभागातून गेल्या निवडणुकीत कोमल मेहोरिलिया (भाजप), रमेश धोंगडे (शिवसेना), शाम खोले (शिवसेना), सूर्यकांत लवटे (शिवसेना) या उमेदवारांनी विजय मिळवला होता.
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्रमांक 22
प्रभाग क्रमांक 22 मध्ये उपनगर, फेरारी नगर, बोधीनगर, जेल रोडचा काही भाग आणि आर्टिलरी सेंटरच्या लगतचा परिसर येतो. हा प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा निवासी भाग आहे. या प्रभागाची अंदाजे लोकसंख्या 40500 ते 44000 च्या आसपास आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळ असल्याने या भागाची लोकसंख्या घनता जास्त आहे. उपनगर नाक्यावरील वाहतूक कोंडी ही या प्रभागातील सर्वात डोकेदुखीची समस्या आहे. जेल रोड आणि उपनगरच्या काही अंतर्गत भागांत कचरा व्यवस्थापनाच्या तक्रारी वारंवार येत असतात. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत लहान मुलांसाठी पुरेशी उद्याने आणि खुल्या जागांचा अभाव येथे जाणवतो. गेल्या निवडणुकीत या प्रभागातून सरोज आहिरे- भाजप, सत्यभामा गाडेकर- शिवसेना, सुनीता कोठुळे- शिवसेना, केशव पोरजे- शिवसेना या नेत्यांनी विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
