
नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया 15 जानेवारी 2026 रोजी पार पडली आहे. त्यानंतर मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरू होणार असून निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यातील जनतेचे या निकालाकडे लक्ष लागलेले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी 2026 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 आणि 8 मध्ये काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊयात.
प्रभाग क्रमांक ७ हा प्रामुख्याने पंचवटी विभागाचा भाग आहे. या प्रभागाचा विस्तार पेठ रोडच्या दोन्ही बाजूला असून यात हनुमानवाडी, फुले नगर, दत्तनगर आणि अमृतधाम परिसराचा काही भाग समाविष्ट होतो. 2011 च्या जनगणनेनुसार या प्रभागाची अंदाजे लोकसंख्या 38000 ते 42000 च्या दरम्यान आहे. या प्रभागात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्त्या असून येथे कामगार आणि मध्यमवर्गीय मतदारांचे प्राबल्य अधिक आहे. या प्रभागातून 2017 च्या निवडणुकीत हिमगौरी अडके (भाजप) योगेश हिरे (भाजप) स्वाती भामरे (भाजप) अजय बोरस्ते (शिवसेना) यांनी विजय मिळवला होता.
प्रभाग क्रमांक 8 चा विस्तार तपोवन, जनार्दन स्वामी मठ, आडगाव नाका आणि पंचवटीच्या काही पूर्व भागापर्यंत पसरलेला आहे. या प्रभागाची लोकसंख्या अंदाजे 39000 ते 44000 च्या आसपास आहे. हा परिसर धार्मिक आणि पर्यटन दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मानला जातो. गोदावरी नदीच्या काठावरील ऐतिहासिक महत्त्व असलेले हे क्षेत्र नाशिकच्या सांस्कृतिक वैभवाचे केंद्र आहे. या प्रभागातून गेल्या निवडणुकीत नयना गांगुर्डे, राधा बेंडकुळे, संतोष गायकवाड, विलास शिंदे या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवला होता.
दरम्यान, या दोन्ही प्रभागात शिवसेना आणि भाजपचा प्रभाव आहे, मात्र गेल्या काही काळात राजकीय परिस्थिती बदललेली आहे. शिवसेनेत फूट पडून दोन वेगवेगळ्या पक्षांची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद विभागलेली आहे. त्यामुळे विरोधकांना या फुटीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही प्रभागांवर सर्वांची नजर असणार आहे.
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE