संजय राठोड यांच्याशी संपर्क झालाय का?; छगन भुजबळ म्हणाले…

पूजा चव्हाण प्रकरणी भाजपने वन मंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं आहे. तेव्हापासून राठोड नॉटरिचेबल आहेत. (no contact with sanjay rathod, says chhagan bhujbal)

संजय राठोड यांच्याशी संपर्क झालाय का?; छगन भुजबळ म्हणाले...
छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस

लासलगाव: पूजा चव्हाण प्रकरणी भाजपने वन मंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं आहे. तेव्हापासून राठोड नॉटरिचेबल आहेत. त्यांनी याप्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना प्रतिक्रिया विचारली असता माझं कुणाशीही बोलणं झालं नाही. कुणाशीही संपर्क झाला नाही, असं स्पष्ट केलं. (no contact with sanjay rathod, says chhagan bhujbal)

येवला येथे 850 कोटी रुपये खर्चून 100 खाटांचं सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आलं आहे. या इमारतीचं छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करणअयात आले. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना तुमचा संजय राठोडांशी संपर्क झाला आहे का? असा सवाल करण्यात आला. त्यावर माझं कुणाशीही बोलणं झालं नाही. कुणाशीही संपर्क झाला नाही. आघाडीतील नेत्यांशी त्यांचा संपर्क झाला की नाही मला माहीत नाही. मी साहित्य संमेलनाच्या कामात व्यस्त आहे, असं भुजबळ म्हणाले.

वृत्तपत्रातूनच सर्व वाचतो

मी वर्तमानपत्रं वाचतो. त्यातील बातमीनुसार पूजा चव्हाणच्या वडिलांनी स्टेटमेंट दिलं आहे. ते माझ्या वाचनात आलं. बाकी मला काही माहीत नाही. मी नाशिकमध्येच आहे, अशी सावध प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. पूजा चव्हाण प्रकरणी राज्यात ठोकशाही सुरू असल्याची टीका विरोधक करत आहेत. त्याकडे भुजबळांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर भुजबळांनी विरोधकांवर टीका केली. दिल्लीत शंभर लोक मेले. अजूनही मरत आहेत. दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी कोणतीही चर्चा होत नाही. ही ठोकशाही नाही का? विरोधकांनी जरा दिल्लीत जाऊन पाहावं, असा टोलाही त्यांनी लगावला.

चंद्रकांत पाटलांना टोला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे माढातून का लढले नाही? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाटील यांच्या या टीकेचाही भुजबळ यांनी समाचार घेतला. शरद पवार हे दुसऱ्या मतदारसंघातूनही खासदार झालेले आहेत. चंद्रकांतदादा पवारांशी स्वत:ची तुलना कशी करतात? नका करू अशी तुलना, असा चिमटाही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना काढला. (no contact with sanjay rathod, says chhagan bhujbal)

 

संबंधित बातम्या:

संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी होणार; अनिल देशमुख यांचं मोठं विधान

अरुण राठोडचं कुटुंब चार दिवसानंतर घरी, पण अरुण अद्याप गायब; घरात झाली लाखो रुपयांची चोरी

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

(no contact with sanjay rathod, says chhagan bhujbal)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI