AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाल्मिक कराड सोबतच्या ‘त्या’ फोटोवर लक्ष्मण हाकेंचा खुलासा, म्हणाले….

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा वाल्मिक कराड सोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी विरोधकांनी हा फोटो बदनामीसाठी वापरल्याचा आरोप केला. त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले.

वाल्मिक कराड सोबतच्या 'त्या' फोटोवर लक्ष्मण हाकेंचा खुलासा, म्हणाले....
वाल्मिक कराड सोबतच्या 'त्या' फोटोवर लक्ष्मण हाकेंचा खुलासा
| Updated on: Jan 09, 2025 | 7:45 PM
Share

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा बीड सरपंच हत्या प्रकरणातील अटकेतील आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन लक्ष्मण हाके यांना विरोधकांकडून टार्गेट केलं जात आहे. यावर आता लक्ष्मण हाके यांनी खुलासा केला आहे. “मी एक ओबीसी आंदोलक आहे. मी सोलापूर जिल्ह्यातल्या सांगवा तालुक्याचा आहे. मी मराठवाड्यात दोन उपोषण केलेली आहेत. अनेक लोकांचे माझ्यासोबतचे फोटो आहेत. वाल्मिक कराड यांच्यासोबतचा तो फोटो कधीचा आहे? आता तो फोटो पोस्ट करून सनसनाटी निर्माण करायची आहे का? लक्ष्मण हाकेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे का?”, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला.

“जर या फोटोमुळे मी बदनाम होत असेल तर मग शरदचंद्र पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस या सगळ्या मंडळींचे देखल वाल्मिक कराड यांच्यासोबत फोटो आहेत. या सगळ्यांसाठी एक जेल तयार करण्यात यावे. तिथे आम्ही एकमेकांशी संवाद साधू, सोशल जस्टीस म्हणजे काय, रिझर्वेशन म्हणजे काय. त्यांना किती मूल्य असते यावर विचार विनिमय करू, अशा घटनांचं राजकारण करू नये. याबाबत आम्हाला विचार विनिमय करायला वेळ तिथे भेटेल”, असं लक्ष्मण हाके म्हणाले.

मनोज जरांगे यांच्या टीकेला लक्ष्मण हाके यांचं प्रत्युत्तर

यावेळी लक्ष्मण हाके यांना मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं. “आम्ही वाट बघत आहोत, ते दुसरं काय बोलू शकतात, त्यांना दुसरं काय येते. त्यांना इथला कायदा, कानून आणि संविधान मान्य आहे का? ते 2200 वर्ष पूर्वीसारखं वागत आहेत. इकडून तिकडून येऊन घुसून मारू, या प्रश्नाची उत्तरे त्यांनाच विचारायला पाहिजे. आम्ही कुठे या घटनेत आरक्षणाबद्दल बोललो? आम्ही म्हणतो संतोष देशमुख यांच्या संवेदनशील विषयात तुम्ही देखील राजकारण आणू नका. ही आमची प्रत्येक वेळी मागणी आहे”, असं लक्ष्मण हाके म्हणाले.

“सीआयडी आणि न्यायव्यवस्थेला फ्री अँड फेअर काम करू द्या ना. दबाव टाकून हा अधिकारी नको, हा अधिकारी नाही पाहिजे. एका विघ्ने नामक अधिकाऱ्याला त्यांनी सीआयडीमधून काढलं असेल, तर आम्ही दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या जाती काढायच्या का? आम्ही असं म्हणायचं का की या अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली आम्हाला न्याय मिळणार नाही, हे असं चालेल का? जातीच्या चष्म्यातून ते लोक पाहत आहेत, असं होऊ नये आमचं म्हणणं आहे”, अशी भूमिका हाके यांनी मांडली.

“आम्ही कुठला लाभ घेतला, सामाजिक न्यायचा लाभ होत असेल तर आम्ही का करू नये? मी सामाजिक न्यायाचं बोलतोय. त्यांना ते कळतंय का पाहा. जरांगे काय बोलतात हे त्यांनाच माहीत. मग तुम्ही कुठले लाभार्थी आहात, वर्ष झालंय तुम्ही महाराष्ट्राला वेठीस धरलंय. मग तुम्ही कोणाची लाभार्थी आहात? तुम्हाला कोणी कोणी लाभ पोहोचवलाय, त्यांना कोणता लाभ अपेक्षित आहे? आधी हे विचारा”, असं लक्ष्मण हाके म्हणाले.

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....