AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : ‘आम्हाला मुंबई वेगळी करायची आहे, पण…’ मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरुन फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबईत महाराष्ट्राचा बाप एकच छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा बाप नाही आणि हे स्वत:ला मुंबईचा बाप म्हणून घेत आहेत. अनौरस पुत्र ऐकला होता पण अनौरस बाप कधी ऐकला नाही असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला लगावला आहे

Devendra Fadnavis : 'आम्हाला मुंबई वेगळी करायची आहे, पण...' मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरुन फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv9
| Updated on: May 15, 2022 | 9:05 PM
Share

मुंबई : मुंबई महापालिका आणि राज्यातील अन्य महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) तोंडावर राज्यात जोरदार टीका आणि आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बीकेसीतील मैदानावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर रविवारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय. शनिवारी बीकेसीतील मैदानात मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहिर सभा घेत आपल्यावर झालेल्या आरोपांचा समाचार घेताला होता. त्यावेळी त्यांनी भाजपसह विरोधी पक्ष नेते फडणवीसांवर जोरदार पलटवार केला होता. तसेच त्यावेळी फडणवीसांच्या मालकांची इच्छा मुंबई स्वतंत्र करण्याची होती असे म्हटले होते. तसेच तुमच्याच काय तुमच्या बापाच्या शंभर पिड्या जरी आल्या तरी हे होणार नाही. मुंबईचा लचटा तोडल्यास तुमचे तुकडे तुकडे करून टाकू असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला होता. त्याला आज फडणवीस यांनी उत्तर दिले असून मुंबई वेगळी करायची आहे आम्हाला पण तुमच्या भ्रष्टाचारापासून, अनाचारापासून, दूराचारापासून, अन्यायापासून असे म्हटले आहे.

शनिवारी बीकेसीतील मैदानात मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहिर सभा घेत फडणवीस यांच्यावर मुंबईवरून टीका केली होती. त्यावर पलटवार आता फडणवीस यांनी केला. तसेच ते म्हणाले, आम्हाला ही मुंबई वेगळीच करायची आहे. ती तुमच्या भ्रष्टाचारापासून, अनाचारापासून, दूराचारापासून, अन्यायापासून. तुम्ही रस्ते, नाली, भूयारं काहीच सोडलं नाही. उद्धवसाहेब, तुम्ही म्हणजे मुंबई, महाराष्ट्र नाही. मुंबईत महाराष्ट्राचा बाप एकच छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा बाप नाही आणि हे स्वत:ला मुंबईचा बाप म्हणून घेत आहेत. अनौरस पुत्र ऐकला होता पण अनौरस बाप कधी ऐकला नाही असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला लगावला आहे.

काही मुद्दा नसला की मुंबई वेगळी करायची आहे

त्याचवेळी मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला लगावताना फडणवीस म्हणाले, यांच्याकडे काही बोलण्यासरखे नसले की मुंबईला वेगळी करायची आहे, असा मुद्दा उपस्थित केला जातो, अशी टीका देवेंद्र यांनी केली. तसेच यावेळी कुणाच्या बापाची हिंमत आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करायची असेही ते म्हणाले. मुंबई वेगळी करायची आहे पण ती तुमच्या भ्रष्टाचारापासून, अत्याचारापासून असे सांगत त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.

काही माहिती आहे का?

त्याचबरोबर शेतकरी आत्महत्या, एसटी कर्मचारी आत्महत्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पाणी वीज मिळत नाही, सामान्य माणसाकडे कोण पाहणार आहे? तुमचं मनोरंजन चाललं आहे पण सामान्य माणसाची आज काय अवस्था आहे? त्याची माहिती आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरुन

त्याचबरोबर बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांच्या‘तुम्ही खरच तिकडे गेला होतात तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली आली असती’,याचा समाचार घेताना,‘बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझं वजन 128 होतं. वजनदार लोकांपासून सावध राहा’,असा इशाराच फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलाय.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.